Pandharpur: नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; डिसेंबर अखेर होणार लोकार्पण!

Maharashtra Update: जून २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या नामसंकीर्तन सभागृहाचे बाह्य बांधकाम पूर्ण झाले
Pandharpur: नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; डिसेंबर अखेर होणार लोकार्पण!
Updated on

Solapur Update: पंढरपूर,ता.४: पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने येथील श्री संत तनपुरे महाराज मठाच्या लगत भव्य असे नामसंकीर्तन सभागृह बांधण्यात येत आहे. जून २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या नामसंकीर्तन सभागृहाचे बाह्य बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावट, वातानुकूलन, एरिया डेव्हलपमेंट आदी कामे सुरू आहेत. तब्बल ६ वर्षे झाली तरी सभागृहाचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने शासनाने सभागृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचे लोकार्पण करावे अशी मागणी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी व पंढरीतील स्थानिक नाट्य कलावंतानी केली आहे.

तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या भजन कीर्तनासाठी व नाट्यकलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी एक अद्ययावत सभागृह असावे यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नातून तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खास बाब म्हणून सुमारे ४० कोटी रुपये खर्चाच्या नामसंकीर्तन सभागृहास मंजुरी दिली होती.

Pandharpur: नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; डिसेंबर अखेर होणार लोकार्पण!
Pandharpur Wari : उरुळी कांचनमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा रोखला; घटनास्थळी पुणे पोलिस अधीक्षक दाखल

तदनंतर पहिल्या टप्प्यातील निधी प्राप्त झाल्यावर १ हजार आसन क्षमतेच्या नामसंकीर्तन सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. श्री संत तनपुरे महाराज मठाच्या पिछाडीला असलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या १ लाख ११ हजार ५८० चौरस फूट जागेमध्ये अंदाजे १ लाख ६४३ चौरस फूट बांधकाम करण्यात आले आहे. या नामसंकिर्तन सभागृहाची आसन व्यवस्था तळमजला आणि बाल्कनी अशी असून भव्य मंच व्यवस्था, अत्याधुनिक सोईसुविधासह वातानुकुल दालन, ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजना, कलाकारांसाठी भव्य मंच, मेकअप रुम, दोन लिफ्ट, व्हीआयपी पाहुण्यांसाठी व अपंगांसाठी लिफ्ट, व्हीआयपी पाहुण्यांसाठी रूम आदी सोयी सुविधांचा समावेश आहे. पहिल्या मजल्यावर पार्किंग, वातानुकूलित बहुद्देशीय हॉल, डायनिंग हॉल असणार आहे. तर दुसऱ्या मजल्यावर पाचशे चौरस फुटांची आर्ट गॅलरी कम हॉल आहे.

पहिल्या टप्प्यात सुमारे २७ कोटी रुपये खर्चून संपूर्ण बाह्य बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तदनंतर सुमारे २६ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला असून दुसऱ्या टप्प्यातील सभागृहाचे दगडी संरक्षक भिंत, दगडी प्रवेशद्वार, अंतर्गत विद्युतीकरण , अग्निरोधक यंत्रणा, अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा, परिसरात आकर्षक कारंजे, अंतरंग सिलिंग सजावट, फ्लोअरिंग, अंतर्गत सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते, गार्डनिंग, लँडस्केपिंग या कामांपैकी काही कामे सुरू करण्यात आली आहेत. तब्बल सहा वर्षे झाली तरी सभागृहाचे काम अपूर्ण असल्याने शासनाने नामसंकीर्तन सभागृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचे लोकार्पण करावे अशी मागणी महाराज मंडळी व नाट्य कलावंतांनी ' सकाळ 'शी बोलताना व्यक्त केली आहे.

Pandharpur: नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; डिसेंबर अखेर होणार लोकार्पण!
Pandharpur Wari 2024 : पंढरीची वाट बिकटच! पैठण-पंढरपूर पालखी दिंडी मार्गाची बोधेगाव येथे दुरवस्था

पंढरीच्या वैभवात घर घालणाऱ्या नामसंकीर्तन सभागृहाचे लोकार्पण यंदाच्या आषाढी यात्रे दरम्यान होईल अशी अपेक्षा आम्हाला होती. तरी सभागृहाची अपूर्ण कामे शासनाने प्राधान्याने पूर्ण करून लवकरात लवकर त्याचे लोकार्पण करावे अशी मागणी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही करत आहोत

.- ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, अध्यक्ष, वारकरी शिक्षण संस्था, पंढरपूर

नामसंकीर्तन सभागृहाच्या इमारतीचे सिव्हील वर्क पूर्ण झाले असून सध्या पीओपी, वायरिंग व रुफींगचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहाच्या अंतर्गत सजावटीसह अनुषंगिक सर्व कामे जलद गतीने पूर्ण करून डिसेंबर अखेरपर्यंत सभागृहाचे लोकार्पण करण्याचे नियोजन केले आहे.

डॉ.प्रशांत जाधव, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद

Pandharpur: नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; डिसेंबर अखेर होणार लोकार्पण!
Pandharpur : पंढरपुरात मराठा भवनासाठी पाच कोटींचा निधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.