Pandharpur News: पंढरपूर शहरातून होतेय जड वाहनांची धोकादायक वाहतूक, नागरीकांचा जिव धोक्यात

Pandharpur News: पंढरपूर शहरातून होतेय जड वाहनांची धोकादायक वाहतूक,  नागरीकांचा जिव धोक्यात
Updated on

Loksabha News: पंढरपूर शहरा बाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने शहरातील केबीपी कॉलेज चौक ते नवीन कराड नाका या लिंक रोड वरून अहोरात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे.

या अवजड वाहतुकीमुळे लिंक रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक कधी बंद होणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. (Maharashtra News)

Pandharpur News: पंढरपूर शहरातून होतेय जड वाहनांची धोकादायक वाहतूक,  नागरीकांचा जिव धोक्यात
Pandharpur News : श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जूनपासून होणार सुरू

पंढरपूर शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौक ते नवीन कराड नाका या रस्त्याचे लिंक रोड असे नाव आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडे असलेल्या समतानगर, जिजाऊनगर, वसंतनगर, वांगीकरनगर, नागालॅन्ड हॉटलमागील भागातील वसाहत, उजनी कॉलनी, शासकीय वसाहत या भागांत मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढली आहे.

या परिसरातच सरकारी कार्यालये, केबीपी महाविद्यालय व चार ते पाच शाळा व हॉस्पिटल्स आहेत. स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांना लिंक रोड वरूनच दररोज येजा करावी लागते.(pandharpur news)

लिंक रोडवरून मशीनरी घेऊन जाणारे लांबलचक ट्रेलर, वाहने घेऊन जाणारे मोठे कंटेनर, टिप्पर अशा जड वाहनांची वाहतूक अहोरात्र सुरू असते. एकापाठोपाठ एक भरधाव वेगात ही वाहने या रस्त्यावरून जात असतात.

Pandharpur News: पंढरपूर शहरातून होतेय जड वाहनांची धोकादायक वाहतूक,  नागरीकांचा जिव धोक्यात
Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

या रस्त्यावर एकही गतिरोधक नसल्यामुळे येथे सतत लहान मोठे अपघात होत असतात. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना लिंक रोड ओलांडताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते. ही जड वाहतूक शहरा बाहेरून जाण्यासाठीच्या बाह्य वळण रस्त्याचे काम अद्यापही सुरूच आहे.(solapur news)

मध्यंतरी वाखरी ते टाकळी बायपास या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र वाखरी ते गुरसाळे या राष्ट्रीय महामार्ग दरम्यान असलेला भीमा नदीवरील उड्डाणपुल अद्याप वाहतुकीस खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे टेंभुर्णी येथून येणारी सर्व अवजड वाहने अहिल्या चौकातून केबीपी कॉलेज चौक ते नवीन कराड नाका ते टाकळी बायपास अशी शहरातील भर वस्तीतून जात आहेत.

पंढरपूर शहरातून जाणारी ही अवजड वाहतूक कधी बंद होणार असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. (marathi news)

चौकट अवजड वाहतूकीमुळे होतेय वाहतूक कोंडी : केबीपी कॉलेज चौकामध्ये पुणे, टेंभुर्णी, सोलापूर व कराड येथून येणारी सर्व अवजड वाहने एकत्रित येत असल्यामुळे येथे सतत वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी येथे एकही वाहतूक पोलीस उपस्थित नसल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये अधिकच भर पडते.

Pandharpur News: पंढरपूर शहरातून होतेय जड वाहनांची धोकादायक वाहतूक,  नागरीकांचा जिव धोक्यात
Pandharpur News : जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता

अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत दुप्पट वाढ: महूद सांगोला या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तो रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद आहे. त्यामुळे महूद मार्गे जाणारी सर्व अवजड वाहने पंढरपूर मार्गे ये जा करत आहेत. त्यामुळे पंढरपूर शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. (accidnet news)

मागील सहा ते सात वर्षापासून लिंक रोड भागातील आम्ही सर्व नागरिक लिंक रोडची जड वाहतूक बंद व्हावी म्हणून मागणी करत आहोत. यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पाठपुरावा केला आहे.

या परिसरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये व उपनगरातील लोकसंख्येचा विचार करता लिंक रोड वरून होणारी जड वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी अशी आमची मागणी आहे.(rodeway news)

- श्याम गोगाव, सामाजिक कार्यकर्ते, पंढरपूर

पंढरपूर शहरा बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भीमा नदीवरील उड्डाणपूल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. त्यानंतर वाहतूक पोलीस प्रशासन टेंभुर्णी मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना गुरसाळे ते वाखरी ते टाकळी बायपास या बाह्यवळण मार्गाचा वापर करू शकेल.

-केशव घोडके, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पंढरपूर विभाग  (citizens news)

Pandharpur News: पंढरपूर शहरातून होतेय जड वाहनांची धोकादायक वाहतूक,  नागरीकांचा जिव धोक्यात
Pandharpur : राज्यभरातील सुमारे दोन लाख भाविकांनी अनुभवला चैत्री एकादशीचा सोहळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.