मंगळवेढा - पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपला निसटत्या मताने पराभव झाला. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर दौऱ्यात राष्ट्रवादीची उमेदवारी विरोधकाला घोषित केल्यामुळे कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव पक्ष सोडावा लागला मात्र पक्षाची विचारधारा सोडली नसल्याची प्रतिक्रिया देत आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणारच अशी ग्वाही भगीरथ भालके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.