Pandharpur Vidhansabha News: पंढरपूर विधानसभेच्या जागेवर उमेदवार कोण द्यावा यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील श्रेयवादाची लढाईत महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण आम्ही नेमका कुणाचा प्रचार करायचा असा प्रश्न शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उपस्थित केला
या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मधून जवळपास डझनभरापेक्षा अधिक जण इच्छुक होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला जागेबाबत योग्य तोडगा न काढता आल्यामुळे काँग्रेसने आपला उमेदवार म्हणून भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना एबी फॉर्म दिला त्यानंतर दोन दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भैरवनाथ कारखान्याची उपाध्यक्ष अनिल सावंत यांना खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म दिला