पंढरपूर : मोक्षदा एकादशीनिमित्त भाविकांमुळे गजबजली पंढरी!

एकादशीनिमित्त राज्यभरातुन आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठल मंदिर परिसर फुलून गेला
पंढरपूर : मोक्षदा एकादशीनिमित्त भाविकांमुळे गजबजली पंढरी!
पंढरपूर : मोक्षदा एकादशीनिमित्त भाविकांमुळे गजबजली पंढरी!sakal
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : मोक्षदा एकादशी निमित्त मंगळवारी (ता.14) पंढरीत आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता. दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभार्‍यात आकर्षक फुलांची सजावट केली होती.

मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्यास पितरांचा मोक्ष होतो आख्यायिका आहे. या एकादशीनिमित्त राज्यभरातुन आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठल मंदिर परिसर फुलून गेला होता. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सारडा भवनच्या पुढे गेली होती. श्रींच्या मुख दर्शनाच्या रांगेसाठी आज दोन तास लागत होते. श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलेले महादेव वामन वनवे (रा.तोंडल, ता. पुरंदर, जि. पुणे) 'सकाळ' शी बोलताना म्हणाले, आम्ही सहकुटुंब मोक्षदा एकादशीनिमित्त पंढरपूर मध्ये आलो होतो.

पंढरपूर : मोक्षदा एकादशीनिमित्त भाविकांमुळे गजबजली पंढरी!
भविष्यात कन्नड व्यावसायिक अडचणीत येतील; शिवसेनेचा इशारा

सकाळी अकरा वाजता दर्शन रांगेत उभे राहिल्यानंतर दुपारी एक वाजता श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले. मात्र पद दर्शन बंद असल्यामुळे मुख दर्शना वरच समाधान मानावे लागले. दरम्यान मोक्षदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यासाठी नानासाहेब पाचुंदकर यांनी झेंडू, ऍस्टर, शेवंती, कामिनी अशी सुमारे सहाशे किलो फुले सजावटीसाठी उपलब्ध करून दिली होती. पुणे येथील कलाकार कुमार शिंदे यांनी या फुलांचा वापर करून आकर्षक अशी रंगीबेरंगी सजावट केल्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्याचे सौंदर्य बहरले होते. याबाबत मुंबई येथील भाविक स्वामी सिद्राम गुर्रम म्हणाले, आम्ही खास मुंबईहून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलोय. श्री विठ्ठलाच्या मुख दर्शनाचा आनंद अवर्णनीय होता.

पंढरपूर : मोक्षदा एकादशीनिमित्त भाविकांमुळे गजबजली पंढरी!
लखीमपूर खेरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट - SIT

अशातच गाभाऱ्यातील फुलांच्या सजावटीमुळे मन प्रसन्न झाले. दरम्यान मोक्षदा एकादशीनिमित्त भाविकांची वर्दळ वाढल्यामुळे पंढरीतील प्रसादिक साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. याबाबत येथील सुगंधी अगरबत्तीचे उत्पादक सागर ताठे-देशमुख म्हणाले, कोरोनामुळे सुमारे दोन वर्षानंतर यंदा कार्तिकी वारी संपन्न झाली. त्यानंतर जवळपास दररोजच भाविकांची पंढरीत गर्दी होत आहे. आज मोक्षदा एकादशी च्या निमित्ताने आलेल्या हजारो भाविकांनी परतीच्या प्रवासाला निघताना प्रासादिक साहित्याची खरेदी केल्याने बाजारपेठेत उलाढाल वाढली असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.