येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2020-21 मध्ये गाळप केलेल्या उसाच्या बिलापोटी प्रतिटन 131 रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.
श्रीपूर (सोलापूर) : येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने (Shri Pandurang Cooperative Sugar Factory) गळीत हंगाम 2020-21 मध्ये गाळप केलेल्या उसाच्या बिलापोटी प्रतिटन 131 रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी (Executive Director Dr. Yashwant Kulkarni) यांनी दिली. गळीत हंगाम 2020-21 मध्ये गाळपास आलेल्या उसाच्या बिलापोटी पांडुरंग कारखान्याने प्रतिटन 2100 रुपये प्रमाणे पहिला हप्ता दिला आहे. त्यानंतर आता प्रतिटन 131 रुपयांप्रमाणे दुसऱ्या हप्त्याची सुमारे 14 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. त्यामुळे गळीत हंगाम 2020-21 मध्ये गाळपास आलेल्या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांना प्रतिटन 2231 रुपये अदा करण्यात आले आहेत. (Pandurang Sugar Factory credits second installment to farmers' accounts)
आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने 10 लाख 6 हजार 770 टन उसाचे गाळप करून सरासरी 11.44 टक्के साखर उताऱ्याने 11 लाख 13 हजार 500 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सद्य:स्थितीत कोविड संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात आहे. अशावेळी श्री पांडुरंग कारखान्याने गेल्या हंगामातील उसाला 131 रुपयांचा दुसरा हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतीतील हंगामपूर्व मशागतीची कामे करण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे. गाळप हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या एफआरपी धोरणानुसार पांडुरंगची एफआरपी प्रतिटन 2431 रुपये आहे. या हंगामात गाळप केलेल्या उसाला कारखान्याने आतापर्यंत 2231 रुपये दिले आहेत. एफआरपीची उर्वरित रक्कम लवकरच देणार असल्याचे सांगितले जात आहे.
गळीत हंगाम 2021-22 साठी पांडुरंगकडे सुमारे 14 हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. त्यातून 11 ते 12 लाख टन उसाची उपलब्धता होईल अशी अपेक्षा आहे. हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्यांमधील सर्व कामे प्रगतिपथावर आहेत. गाळप हंगाम वेळेवर सुरू केला जाणार आहे. त्यासाठी लागणारी तोडणी व वाहतूक यंत्रणा देखील उभारली आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.