Solapur: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर परिचारक सक्रीय, पालकमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

Chandrakant Patil: मंगळवेढातील रखडलेल्या अण्णाभाऊ साठे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून त्यांनी तालुक्याच्या प्रश्नात हात घालण्यास सुरुवात केली.
Solapur: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर परिचारक सक्रीय, पालकमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी
Updated on

Mangalwedha: सकाळ वृत्तसेवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढ्यातील प्रश्नाबाबत लक्ष घालण्यास सुरुवात केली असून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा व अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी निधी देण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली

या संदर्भात स्मारक समितीच्या सदस्यांनी प्रशांत परिचारक यांची भेट घेतली.त्यावर त्यांनी मागणी केली. मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी लोकसभागातून निधीच्या निधी उभारत अश्वारूढ पुतळा आणून ठेवण्यात आला. मात्र पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी नुकताच 82 लाखाचा जिल्हा नियोजन मंडळ मधून मंजूर झाला.मात्र पुतळा बसवण्यासाठी आवश्यक असलेली परवानगीची मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आली.

Solapur: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर परिचारक सक्रीय, पालकमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी
सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर माढ्यातून मोहितेंचा विजय

मात्र पुतळा बसवण्यासाठी अद्याप परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली नाही ती परवानगी द्यावी अशी मागणी प्रशांत परिचारक यांनी थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली तर अण्णाभाऊ साठे पुतळा बसवण्यासाठी 25 लाखाचा निधी यापूर्वी मंजूर झाला. मात्र तो निधी कमी असल्यामुळे वाढीव निधीची आवश्यकता असल्याने त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ मधून 50 लाखाच्या निधीची तरतूद करावी अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली.

Solapur: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर परिचारक सक्रीय, पालकमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी
Solapur: अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाचा फेरसर्वे करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन

3 जानेवारीला परिचारक समर्थकांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी केली होती मात्र प्रशांत परिचारकाने त्यावेळी कार्यकर्त्यांना कामाला लागा असा संदेश दिला मात्र ते स्वतः कोणत्याही कार्यक्रमात सक्रिय होताना दिसले नाहीत मात्र सध्या मंगळवेढातील रखडलेल्या अण्णाभाऊ साठे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून त्यांनी तालुक्याच्या प्रश्नात हात घालण्यास सुरुवात केली.

Solapur: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर परिचारक सक्रीय, पालकमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी
Solapur : विधानसभेच्या काही जागावर शिक्षकांना संधी द्यावी; शिक्षक समितीची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.