'हुतात्मा एक्सप्रेस' बंद ! प्रवाशांची पुन्हा एसटीकडे धाव

"हुतात्मा' बंद ! प्रवाशांची पुन्हा एसटीकडे धाव; दररोज 15 हजार प्रवाशांची पुण्याला ये-जा
निगडी बस स्थानक - पीएमपी बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची धावपळ.
निगडी बस स्थानक - पीएमपी बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची धावपळ.esakal
Updated on
Summary

भाळवणी ते भिगवण दरम्यानच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी इंजिनिअरिंग ब्लॉक घेण्यात आला आहे.

सोलापूर : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे रेल्वे (Train) व एसटी बससेवा (ST Bus) कधी बंद कधी सुरू अशी परिस्थिती होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना व अनेक मार्गांवर रेल्वे प्रवास सुरू असताना, भाळवणी ते भिगवण दरम्यानच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी इंजिनिअरिंग ब्लॉक घेण्यात आल्याने हुतात्मा एक्‍स्प्रेस (Hutatma Express) बंद आहे. त्यामुळे पुणे (Pune) - सोलापूर (Solapur) अप अँड डाउन करणाऱ्या प्रवाशांची मोठी पंचाईत झाली आहे. परिणामी सोलापूर- पुणे प्रवासासाठी प्रवाशांनी आता पुन्हा एसटी बसकडे धाव घेतली आहे. सोलापूर बसस्थानकामधून दररोज 15 हजार प्रवासी पुणे- सोलापूर ये-जा करीत आहेत.

निगडी बस स्थानक - पीएमपी बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची धावपळ.
मोहोळ दुहेरी खून प्रकरण : पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

कोरोनामुळे सर्वच प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रवास करणे कठीण बनले होते. कोरोनाचा राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा एसटीची चाके जागेवर थांबली होती. मागील दीड वर्षापासून एसटी कधी सुरू तर कधी बंद अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अनलॉक होताच पुन्हा एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. सोलापूर बसस्थानकावरून दररोज 15 हजार प्रवासी पुण्याकडे ये- जा करीत असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

निगडी बस स्थानक - पीएमपी बसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची धावपळ.
श्रीगुरु बालाजी तांबे यांनी दिली होती पंढरपूरला भेट

नोकरी, शिक्षण, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिक देखील एसटी बससेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. त्यात सोलापूर - पुणे प्रवासाची लाइफलाइन असलेली हुतात्मा एक्‍स्प्रेसदेखील दुहेरीकरणाच्या कामामुळे बंद आहे. परिणामी एसटीकडे प्रवाशांनी धाव घेतली असून, त्याचा फायदा एसटी महामंडळाला होत आहे. दरम्यान, पुण्यासह मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा यांसह मराठवाड्यातील विविध शहरांकडे धावणाऱ्या बसदेखील आता पूर्ववत पूर्ण प्रवासी क्षमतेने धावत असल्याचे महामंडळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे मार्गावरील फेऱ्या वाढविल्या

पुण्याकडे जाण्यासाठी मागील काही दिवसांत एसटीला मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यामुळे सोलापूर बसस्थानकातून पुण्याकडे जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे नियम पाळत प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे आवाहनही एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.