रस्ता व कुकडीच्या पाणीप्रश्नी आमदार शिंदेची दिल्लीत पवार भेट

आमदार संजय शिंदे यांनी नुकतीच दिल्ली दौरा केला आहे
Sanjay Shinde
Sanjay Shindesakal
Updated on

करमाळा : करमाळा तालुक्यातील जातेगाव ते टेंभुर्णी रस्ता व कुकडीचे पाणी याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. यावेळी सकारत्मक चर्चा झाली आहे. येत्या 10 दिवसात कुकडीच्या प्रश्नावर बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली आहे.

Sanjay Shinde
उन्हाळी सुट्टीतही भरणार शाळा? कोरोनात शाळा बंद राहिल्याने गुणवत्ता घसरली

आमदार संजय शिंदे यांनी नुकतीच दिल्ली दौरा केला आहे. यावेळी त्यांनी जातेगाव ते टेंभुर्णी रस्ता व कुकडीचे पाणी यावर पवार यांच्याशी चर्चा केली.यावेळी बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, विठ्ठल कार्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर व निमगाव टें चे सरपंच यशवंत शिंदे व चोभेपिंपरीचे विक्रम उरमुडे उपस्थित होते. याबाबत पुढे बोलताना आमदार संजय शिंदे म्हणाले, जातेगाव ते टेंभुर्णी रस्ताला आपण ना हरकत प्रमाणपत्र मिळवले आहे.माञ राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून काही तृटी काढण्याचे काम सुरू झाल्याने काम पुन्हा रखडण्याची चिन्हे दिसू लागली होती म्हणून तात्काळ आपण दिल्ली येथे जाऊन खासदार शरद पवार

भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला .त्यानंतर तात्काळ पवार साहेब केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्याशी बोलले.त्यामुळे या रस्त्याचे लवकरच टेंडर होणार आहे.दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे,करमाळा तालुक्याला मिळणार कुकडीचे 6 टीएमसी पाणी पूर्ण क्षमतेने मिळाले पाहीजे. यासाठी आपण पवार साहेबांकडे मागणी केली असुन येत्या 10 दिवसात याबाबत बैठक घेण्यात येणार आहे.

Sanjay Shinde
करमाळा : कार्यक्षेत्रातील ऊस सोडून बीडच्या ऊसाचे कारखान्याकडून गाळप

आदिनाथ आपण घेण्याबाबत नाही तर आदिनाथ सुरू झाला पाहीजे यावर झाली चर्चा -आमदार संजय शिंदे 'सध्या तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. तालुक्यात उजनीसह दहिगाव उपसासिंचन, कुकडी, सीना कोळगावक्षेत्रात यावर्षी पाणी चांगले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीवर भर आहे.भविष्यात ऊसाचे वाढते क्षेञ लक्षात घेता आदिनाथ सुरू झाला पाहीजे यावर चर्चा झाली पण आपण आदिनाथ घेऊन चालवायचा असा काही विषय झाला नाही.

आदिनाथ पुढच्यावर्षी सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पुढच्या वर्षी आणखी ऊस वाढत आहे. त्यामुळे प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहे.आमदार रोहीत पवार हे ही कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.आदिनाथ बारामती ऍग्रोने सुरु करावा अन्यथा दुसऱ्या पर्यायाचा वापर करावा पण कारखाना सुरू व्हावा असा विषय झाला.

आमदार संजय शिंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()