दंड वाढला, तरीही अपघात कमी नाहीत! दरवर्षी बाराशे कोटींची दंड वसुली

बेशिस्त वाहनचालकांच्या दंडाची रक्कम दुप्पट करूनही आणि दरवर्षी दीड हजार कोटींचा दंड वसूल करूनही रस्ते अपघात कमी झालेले नाहीत. एकाचवेळी एकापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेले अपघात सर्वाधिक आहेत.
अपघात
अपघातSAKAL
Updated on

सोलापूर : बेशिस्त वाहनचालकांच्या दंडाची रक्कम दुप्पट करूनही आणि दरवर्षी दीड हजार कोटींचा दंड वसूल करूनही रस्ते अपघात कमी झालेले नाहीत. जानेवारी २०१९ पासून २२ मे २०२२ पर्यंत जिल्ह्यातील विविध मार्गांवर साडेतीन हजार अपघात झाले असून त्यात तब्बल दोन हजार जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात एकाचवेळी एकापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेले अपघात सर्वाधिक आहेत.

अपघात
रस्ता सुरक्षेसाठी खासदारांना मिळेना वेळ! जिल्ह्यात साडेतीन वर्षांत दोन हजार मृत्यू

रस्ते अपघात होणार नाहीत, याची जबाबदारी प्रामुख्याने महामार्ग पोलिस, स्थानिक पोलिस, आरटीओ यांच्यावर आहे. त्यासाठी जिल्ह्यातील खासदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, आरटीओ आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे संचालक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची रस्ता सुरक्षा समिती आहे. नियमानुसार प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीची तर तीन महिन्यातून एकदा खासदारांच्या समितीची बैठक व्हायला हवी. पण, मागील तीन वर्षांत त्यात सातत्य न राहिल्याने अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजनाच झालेल्या नाहीत. तर दुसरीकडे वाहनचालकांचाही बेशिस्तपणा वाढल्याचे चित्र आहे. चारचाकी आहे, पण सिटबेल्ट वापरत नाहीत, दुचाकी आहे, पण हेल्मेट घालत नाहीत. वाहनांचा अतिवेग हा देखील अपघाताचे प्रमुख कारण ठरले आहे. तसेच अनोळखी रस्ता असतानाही अनेकजण वाहनाचा स्पिड ओलांडतात, असेही निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे. तरीदेखील संबंधित प्रशासनाचाही कानाडोळा अपघात वाढीसाठी कारणीभूत ठरु लागला आहे.

अपघात
राज्यात प्रत्येक तासाला दोघांचा अपघाती मृत्यू! चिंताजनक माहिती

जिल्ह्यातील अपघाताची स्थिती...

  • २०१९

  • एकूण अपघात

  • १०६५

  • मृत्यू

  • ६१५

  • --

  • २०२०

  • एकूण अपघात

  • ८१३

  • मृत्यू

  • २९३

---

२०२१

  • एकूण अपघात

  • ९५५

  • मृत्यू

  • ६१६

---

२०२२

  • एकूण अपघात

  • ३९२

  • मृत्यू

  • ३५८

अपघात
सोलापूर: काँग्रेसला गळती अन्‌ नेत्यांचे लक्ष मुंबई-दिल्लीत; राष्ट्रवादीचा डाव?

बेशिस्त वाहतूक बंद व्हावी, अपघात होऊ नयेत म्हणून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातून दरमहा ५५ ते ८९ लाख रुपयांचा दंड वसूल होतो. तरीही, अनेकजण वाहतूक नियम पाळत नसल्यानेच अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

- मनोजकुमार यादव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक, सोलापूर ग्रामीण

अपघात
पदभरतीवरील ‘वित्त’चे निर्बंध उठले! राज्यात ९० हजार पदांची मेगाभरती शक्य

पेनूरजवळील ‘तो’ अपघात अतिवेगामुळेच

मोहोळजवळील पेनूर येथे झालेला भीषण अपघात दोन्ही वाहनांच्या अतिवेगामुळेच झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्कॉर्पिओच्या चालकासह इतर कोणीही सिटबेल्ट घातला नसल्याने एअर बॅग उघडलेल्या नाहीत. त्याठिकाणी ५० फुटाचा रस्ता असतानाही दोन्ही वाहने समोरासमोर धडकली आणि सहा जणांचा मृत्यू झाला. वाहनचालकाला गाडी आवरली नसल्यानेच हा अपघात झाल्याचे आज समोर आले. ग्रामीण वाहतूक पोलिस दलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सोमवारी (ता. २३) त्याठिकाणी भेट देऊन अपघाताची कारणे शोधली. त्यावेळी ही माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.