पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? दोन्ही मुलीच झाल्या; कुटुंबाला वारस दिला नाही म्हणून पती, सासूकडून पत्नीचा छळ

घराचे बांधकाम करायचे आहे, नाहीतर तुला नांदवणार नाही’ म्हणून सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला.
Harassment of married woman
Harassment of married womanesakal
Updated on
Summary

तू आम्हाला वारस दिला नाही, दोन्ही मुलींनाच जन्म दिला म्हणून पती व सासूने वारंवार छळ केला.

सोलापूर : ‘कंपनी बंद पडलीय, कामधंदा नाही, माहेरून आठ लाख रुपये आण, घराचे बांधकाम करायचे आहे, नाहीतर तुला नांदवणार नाही’ म्हणून सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. आई-वडिलांनी कर्ज काढून पाच लाख रुपये दिले

तरीसुद्धा संशय घेऊन सासरच्यांनी त्रास दिला. दोन्ही मुलीच झाल्या, आम्हाला वारस दिला नाही म्हणूनही छळ केला, अशी फिर्याद प्रियंका महेश मोरे (रा. बुधवार पेठ) यांनी फौजदार चावडी पोलिसांत (Chavadi Police) दिली.

Harassment of married woman
Deepak Kesarkar : '..तर दीपक केसरकर भाजपमध्ये जातील'; ठाकरे गटाच्या प्रवक्त्याचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, २९ एप्रिल २०१२ ते १२ एप्रिल २०२३ या काळात सासरच्यांनी विविध कारणांवरून छळ केला. पती व सासूने घरातील किरकोळ कामावरून शिवीगाळ करीत मारहाण देखील केली. काम करीत असलेली कंपनी बंद पडल्याने आता कामधंदा नाही. त्यामुळे माहेरून आठ लाख रुपये आण, नाहीतर नांदवणार नाही अशी दमदाटी केली.

Harassment of married woman
Vaibhav Naik : ..म्हणून शिंदे गटाचे 'ते' 16 आमदार अपात्र होणार; सुप्रीम कोर्टाचा दाखला देत नाईकांचं स्पष्टीकरण

माहेरच्यांना विनंती केल्यावर त्यांनी पाच लाख रुपये कर्ज काढून सासरच्यांना दिले. तरीपण, त्यांनी संशय घेऊन दोन मुलींसह घरातून हाकलून दिले. आईने वेळोवेळी विनंती केली, पण नांदवणार नाही असे त्यांनी सांगितले.

सातारा येथे नणंदेच्या खोलीत ठेवले. सोने घेऊन तेथून माहेरी हाकलून दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून पती महेश शाहू मोरे व सासू राधा शाहू मोरे (दोघेही रा. थेरगाव फाटा, पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार श्री. मुजावर तपास करीत आहेत.

Harassment of married woman
CM Siddaramaiah : 'ते' सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

'तू अन्‌ तुझ्या मुली भीक मागून खावा’

तू आम्हाला वारस दिला नाही, दोन्ही मुलींनाच जन्म दिला म्हणून पती व सासूने वारंवार छळ केला. तू आमच्याकडे आता नांदायला येवू नको, तू आणि तुझ्या दोन्ही मुली भीक मागून खावा म्हणून त्यांनी माहेरी हाकलून दिले.

तसेच तुम्हाला खुल्लास करतो आणि मी दुसरे लग्न करतो, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. पुरोगामी महाराष्ट्रात मुलाऐवजी मुलींनाच जन्म दिला म्हणून विवाहितांचा कौटुंबिक छळ होतोय, हे शासनाच्या ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’चा लोकांना विसर पडल्याची सद्य:स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.