PM Modi Solapur Visit: पंतप्रधान मोदी आठवड्याभरात दुसऱ्यांदा राज्याच्या दौऱ्यावर; जगातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे करणार लोकार्पण

PM Narendra Modi Solapur Visit: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगार, कष्टकरी जनतेचे घरकुलाचे स्वप्न साकार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गृहप्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.
PM Modi Solapur Visit
PM Modi Solapur VisitEsakal
Updated on

सोलापूर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगार, कष्टकरी जनतेचे घरकुलाचे स्वप्न साकार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गृहप्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. यामुळे हजारो कुटुंबांना हक्काचा निवारा मिळणार आहे. आज हजारो कामगार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.

रे नगर गृहप्रकल्पामुळे मोदीची गॅरंटी हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. जानेवारी २०१९ मध्ये मोदींनी भूमिपूजनाप्रसंगी हा प्रकल्प पूर्ण करून घरकुलाची चावी देण्यासाठी मीच येणार असे सांगितले होते. आज ते वाक्य सत्यात अवतरत आहे. गृहप्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी आज कुंभारी येथे साकारात असलेल्या रे-नगर येथे येणार आहेत. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत.

PM Modi Solapur Visit
Ayodhya Ram Mandir : गर्भगृहात विराजमान प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला फोटो आला समोर

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. कार्यक्रमस्थळी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या पीएमओ कार्यालयाने सर्व यंत्रणा नियंत्रणात खाली घेतली आहे. ते चोख व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विविध जिल्ह्यातून आलेले पोलिस दल या ठिकाणी आठ दिवसांपासून मुक्कामी आहेत. एकंदर परिस्थिती पाहता रे नगरला पोलिस छावणीचे स्वरूप आलेले आहे.

PM Modi Solapur Visit
Delhi Pitampura Fire: चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी; प्रशासनाकडून जय्यत तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाच्या हस्तांतर सोहळ्यासाठी कुंभारीच्या माळरानावर तयार झालेल्या रे नगर येथे आज येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण रे नगरची सजावट करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. तीस हजार घराच्या प्रकल्पापैकी १५ हजार घरांचे हस्तांतरण आज होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रमिकांसाठी तयार झालेल्या घरांच्या हस्तांतरण सोहळ्यासाठी येणार आहेत. त्यासाठी घरांची रंगरंगोटी, सभामंडप, रस्ते, वीज पुरवठा, स्वागत कमानी, सभामंडपात एलईडी वॉल भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.

सभेच्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी पन्नास हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोदींचे भाषण ऐकता यावे व पाहता यावे यासाठी सभामंडपाच्या दोन्ही बाजूला एलईडी वॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासूनच नागरिक सोलापूर शहरातील विविध भागातून या ठिकाणी पोचणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी पाच वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्रीगणांसाठी व्यासपीठाच्या मागे सहा हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे.

PM Modi Solapur Visit
Coaching Classes: कोचिंग क्लासेसमध्ये आता १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही; केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना

अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानिमित्त अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त कुंभारी च्या रे नगर येथे ठेवण्यात आले आहे. सात आठ दिवसापासून विविध जिल्ह्यातील पोलिसांची, विविध पथके रे-नगर येथेच मुक्कामी आहेत. शेकडो पोलिसांची वाहने व हजारो पोलिस त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे रे नगरला छावणीचे स्वरूप आले आहे. (Unprecedented police presence)

सभा स्थळाशेजारी योग केंद्र

रे-नगरातील सभास्थळाच्या शेजारी आडम मास्तर यांच्या मातोश्री कै. लक्ष्मीबाई नारायणराव आडम यांच्या स्मरणार्थ तयार केलेल्या योग केंद्राची सजावट करण्यात आली आहे.यामध्ये ओपन जिमची संकल्पना देखील राबवण्यात आली आहे. व्यायामासाठी विविध साधने या ठिकाणी उपलब्ध आहेत. या योग केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ योगमुद्रेतील सुंदर शिल्पाकृती बसवण्यात आले आहेत. (Yoga center next to the meeting place)

PM Modi Solapur Visit
Ayodhya Ram Mandir : 'रामायण' मालिकेची निर्मिती करणाऱ्या रामानंद सागर यांच्या कुटुंबाला निमंत्रण नाही; प्रेम सागर म्हणाले...

अनिल पंधे यांच्या स्मरणार्थ कौशल्य विकास केंद्र

बांधकाम व्यावसायिक व रे-नगरची संकल्पना सत्यात आणण्यासाठी धडपड करणारे स्व.अनिल पंधे यांच्या स्मरणार्थ व्यासपीठाच्या पाठीमागे कौशल्य विकास केंद्र व इनोव्हेशन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून हजारो युवकांना विविध कौशल्ये शिकवली जाणार आहेत. इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून नव्या संकल्पनांना आर्थिक मदत देऊन नवे उद्योजक घडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. (Skill Development Center in memory of Anil Pandhe)

स्वच्छतागृहाची व्यवस्था

रे-नगरात या सोहळ्यासाठी किमान एक लाख लोक सभेस येतील असा अंदाज रे-नगरचे प्रवर्तक आडम मास्तर यांनी व्यक्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांसाठी जवळपास तीन हजार फिरत्या शौचालयांची व्यवस्था या माळरानावर करण्यात आली आहे. त्यासाठी पंढरपूर येथील शौचालय येथे मागवण्यात आले आहेत. (Toilet arrangement)

सुसज्ज पार्किंगची व्यवस्था

चार चाकी, दुचाकी व मोठ्या वाहनांसाठी रे-नगर येथे सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वाहण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. मोकळ्या जागेत पांढरे पट्टे मारून वाहन तळासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. (Furnished parking arrangement)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.