मुलगा होत नाही म्हणून पत्नी व तीन मुलींना ठेवले दीड वर्षापासून डांबून!

मुलगा होत नाही म्हणून पत्नी व तीन मुलींना ठेवले दीड वर्षापासून डांबून!
Updated on
Summary

महिला व तीच्या सोबतच्या तीनही मुलींची सुटका करुन पोलिसांनी संशयित आरोपी बरडे याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयितास अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक सुरेश घुले पुढील तपास करीत आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : मुलगा होत नाही या कारणावरुन पत्नी व तीन मुलींना दीड वर्षापासून डांबून ठेवून पत्नीवर अत्याचार केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी एकास अटक केली. अटक केलेला संशयित आरोपी दत्तात्रय कृष्णा बरडे (वय 45) याच्या ताब्यातून त्याच्या पत्नीची आणि तिन्ही मुलींची पोलिसांनी सुटका केली. बरडे हा भारतीय जनता पक्षाचा माजी शहर सरचिटणीस आहे. (Police arrested a man for harassing his wife in Pandharpur)

मुलगा होत नाही म्हणून पत्नी व तीन मुलींना ठेवले दीड वर्षापासून डांबून!
आशादायक ! पंढरपूर तालुक्‍यातील 11 गावे झाली कोरोनामुक्त

पंढरपूर येथील झेंडे गल्लीतील मारुतीबुवा कराडकर महाराज मठा समोरील एका घरामध्ये एका महिलेला आणि तीच्या तीन मुलींना दीड वर्षापासून डांबून ठेवले असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील निर्भया पथकास मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम व पोलिस निरीक्षक अरुण पवार यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. त्यानंतर पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुरेश घुले, गणेश इंगोले, अरबाज खाटीक, कुसुम क्षीरसागर, निता डोकडे, चंदा निमगिरे आणि अविनाश रोडगे यांनी साध्या वेशात जाऊन चौकशी केली. तेव्हा सदर महिला ही अत्यंत घाबरलेल्या खोलीतील कोपऱ्यामध्ये बसलेली दिसून आली.

मुलगा होत नाही म्हणून पत्नी व तीन मुलींना ठेवले दीड वर्षापासून डांबून!
पंढरपूर येथे केवळ 38 तासांत उभारले कोव्हिड हॉस्पिटल !

मुलगा झाला नाही व तीनही मुली झाल्या आहेत, या कारणावरुन महिलेचा पती दत्तात्रय बरडे याने पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महिला व तीच्या सोबतच्या तीनही मुलींची सुटका करुन पोलिसांनी संशयित आरोपी बरडे याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयितास अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक सुरेश घुले पुढील तपास करीत आहेत. (Police arrested a man for harassing his wife in Pandharpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.