अखेर आमदार पडळकरांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी पकडले !

अखेर आमदार पडळकरांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी पकडले !
MLA Padalkar
MLA PadalkarCanva
Updated on

30 जूनच्या रात्री भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अमित सुरवसे याने मोठा दगड मारला. घटनेनंतर पसार झालेले दोघेही संशयित आरोपी पोलिसांना दोन दिवसांपासून गुंगारा देत होते.

सोलापूर : घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आल्यानंतर 30 जूनच्या रात्री भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर अमित सुरवसे याने मोठा दगड मारला. घटनेनंतर पसार झालेले दोघेही संशयित आरोपी पोलिसांना दोन दिवसांपासून गुंगारा देत होते. अखेर त्यांना गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर (Shailesh Khedkar, Sub-Inspector of Police, Crime Branch) यांच्या पथकाने आज बक्षिहिप्परगा येथून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ते दोघेही मागील दोन दिवसांत शेतातच राहात असल्याने पोलिसांनी संशय येऊ नये म्हणून शेतकऱ्यांचा पोषाख घातला होता. (Police arrested the assailant of MLA Gopichand Padalkar's car)

MLA Padalkar
सोलापुरात उद्या मराठा आक्रोश मोर्चा ! सांगली, दौंडवरून मागवला पोलिस बंदोबस्त

आमदार पडळकर यांनी त्या दिवशी (30 जून) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवारांवर टीका केली. त्याचा राग मनात धरून अमित सुरवसे याने आमदार पडळकरांच्या गाडीवर दगड मारल्याचा पोलिसांना संशय आहे. तत्पूर्वी, अमितने पडळकर हे कार्यक्रम संपवून त्या परिसरातून कधी जाणार आहेत, याची माहिती मिळविली. रात्री पावणेआठच्या सुमारास त्यांच्या गाड्यांचा ताफा मड्डी वस्ती परिसरात आला. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या अमितने जवळ ठेवलेला दगड उचलला आणि पडळकरांच्या गाडीवर टाकला. दगड टाकल्यानंतर तत्काळ त्याने तिथून पळ काढला. त्या वेळी त्याने 'महाराष्ट्राचा बुलंद आवाज श्री शरद पवार (Sharad Pawar) जिंदाबाद' अशा घोषणा दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यामुळे तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच (NCP) कार्यकर्ता असल्याची चर्चा सुरू झाली.

MLA Padalkar
मराठा आक्रोश मोर्चा! शहर-जिल्ह्यात संचारबंदी, एसटी बसच्या मार्गात बदल

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटोही व्हायरल झाले. अधिवेशन जवळ आल्याने आणि आमदाराच्या गाडीवर दगडफेक झाल्याने मागील दोन दिवसांपासून पोलिस हल्लेखोराचा रात्रंदिवस शोध घेत होते. दरम्यान, पडळकर समर्थकांनी शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे वातावरण चिघळण्यापूर्वीच त्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यासाठी पोलिसांनी सायबर क्राईमचीही मदत घेतली. नीलेश क्षीरसागर व अमित सुरवसे या दोघांना पकडण्याची प्रमुख जबाबदारी शैलेश खेडकर यांच्यावर सोपविली. पोलिस आयुक्‍तांचा विश्‍वास सार्थ ठरवत खेडकर यांच्या पथकाने त्यांना आज पकडले. शंकर मुळे, राजेश चव्हाण, विद्यासागर मोहिते, सुहास अर्जुन, सनी राठोड, राहुल गायकवाड, विजयकुमार वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्या दोघांना गुन्हे शाखेने जोडभावी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.

ठळक बाबी...

  • 30 जूनला अमित सुरवसे याने केली होती आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

  • घटनेनंतर हल्लेखोराने शहरातून काढला पळ; सावळेश्‍वर टोल नाक्‍यावर सीसीटीव्ही असल्याने हल्लेखोरांनी बदलला मार्ग

  • दोन दिवसांत त्यांचा दुचाकीवरूनच राहिला दहिटणे, बक्षिहिप्परगा, सोलापूर शहरासह परिसरात वावर

  • मास्क लावून हॉटेलमधून घ्यायचे पार्सल जेवण; मुक्‍कामासाठी जायचे शेतात

  • पोलिसांना ते दोघेही बक्षिहिप्परगा या ठिकाणी असल्याची मिळाली माहिती; संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी केले वेशांतर

  • शेतकऱ्याचा वेष धारण करून गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याजवळ पोचले; अगदी जवळ आल्यानंतर त्यांना समजले पोलिसच आहेत

  • गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने केली कारवाई; दोघेही जोडभावी पेठ पोलिसांच्या ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()