डी-मार्टमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल ! चार मिनिटांत पोलिस घटनास्थळी

डी-मार्टमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल ! चार मिनिटांत पोलिस घटनास्थळी
डी-मार्टमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल ! चार मिनिटांत पोलिस घटनास्थळी
डी-मार्टमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल ! चार मिनिटांत पोलिस घटनास्थळीCanva
Updated on
Summary

पोलिसांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला आणि जुळे सोलापुरातील डी- मार्टमध्ये बॉम्ब असल्याचा निरोप मिळाला.

सोलापूर : सकाळची दहाची वेळ... पोलिसांना (Police) एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला आणि जुळे सोलापुरातील डी- मार्टमध्ये बॉम्ब (Bomb) असल्याचा निरोप मिळाला. समोरील व्यक्‍तीने तुम्ही तत्काळ पोचा, अन्यथा अनर्थ होईल, असे म्हणून कॉल कट केला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांचे जलद प्रतिसाद पथक (Quick Response Squad) अवघ्या चार मिनिटात घटनास्थळी पोचले. पोलिसांना पाहून ग्राहक, डी-मार्टचे कर्मचारी घाबरले. पोलिसांनी त्यांना बाजूला केले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या (Bomb Squad) मदतीने बॉम्बचा शोध झाला.

डी-मार्टमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल ! चार मिनिटांत पोलिस घटनास्थळी
आबासाहेबांनी विधानमंडळाच्या संस्थेची उंची वाढवली : देवेंद्र फडणवीस

अनोळखी क्रमांकावरून बॉम्ब ठेवल्याचा कॉल येताच सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली. पोलिस अधिकारी, कर्मचारी, बॉम्ब शोधक पथक, दहशतवाद विरोधी पथक, रुग्णवाहिका, श्‍वान पथक या सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. अवघ्या चार मिनिटांत पोलिस त्या ठिकाणी पोचले. सुरवातीला तपासणी केली आणि एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची जागेवर चौकशी केली. तोपर्यंत डी-मार्टमध्ये खरेदीसाठी आलेले ग्राहक भीतीने थरथरत होते. वेगवेगळे पथकातील अधिकारी, कर्मचारी धावपळ करीत होते. संशयिताची चौकशी पाहून ग्राहक पुरते घाबरून गेले होते. बॉम्ब सापडला की नाही, सापडलेला बॉम्ब निकामी केल्याची बातमी कधीपर्यंत समजते, तोवर बॉम्ब फुटतो की काय, असे प्रश्‍न ग्राहकांच्या मनात येत होते. काही वेळाने वरिष्ठ अधिकाऱ्याने जाहीर केले हा "मॉक ड्रिल' असून घाबरू नका. त्यानंतर हे शब्द कानावर पडताच सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, सुरक्षा शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पाटील, जलद प्रतिसाद पथकाचे पोलिस उपनिरीक्षक रवी बुरकुले, एटीएसचे ए. एस. आय शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

डी-मार्टमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल ! चार मिनिटांत पोलिस घटनास्थळी
मोहोळच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना विशेष खडतर सेवा पदक !

मॉक ड्रिलमध्ये या पथकांची तत्परता

बॉम्ब असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बॉम्बशोधक व नाशक पथकाचे दहा-बारा कर्मचारी, जलद प्रतिसाद पथकातील 40 कर्मचारी, सुरक्षा शाखेचे चार तर दहशतवाद विरोधी पथकाचे तीन, स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी, श्‍वान पथक आणि अग्निशामक अधिकारी व कर्मचारी, रुग्णवाहिका हा सर्व बंदोबस्त घटनास्थळी काही मिनिटात पोचतो. आज डी-मार्टमध्ये बॉम्ब असल्याचे समजताच सर्वांनी काही मिनिटांत त्या ठिकाणी धाव घेतली. अचानक आलेल्या पोलिसांना पाहून डी-मार्टचे व्यवस्थापक सचिन हडप, कर्मचारी, ग्राहक घाबरून गेले. 40 ते 50 मिनिटांनंतर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा मॉक ड्रिल होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.