सोशल मीडियावर तरुणीची बदनामी! पंजाबचा तरुण जेरबंद

सोशल मीडियावर तरुणीची बदनामी! सांगोला पोलिसांनी केले पंजाबच्या तरुणाला जेरबंद
सोशल मीडियावर तरुणीची बदनामी! पंजाबचा तरुण जेरबंद
सोशल मीडियावर तरुणीची बदनामी! पंजाबचा तरुण जेरबंदSakal
Updated on
Summary

पंजाब येथील तरुणाने तरुणीचे व्हिडिओ कॉलद्वारे अश्‍लील व्हिडिओ तयार केले व ते सोशल मीडियावर पाठवून मुलीची बदनामी केली.

महूद (सोलापूर) : लूडो गेम खेळत असताना झालेल्या ओळखीतून पहिल्यांदा मुलीचा विश्वास संपादन केला... मैत्री केली अन्‌ नंतर व्हिडिओ कॉलद्वारे अश्‍लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर (Social Media) पाठवून मुलीची बदनामी केली... असे कृत्य करणाऱ्या पंजाबमधील (Punjab) तरुणाला सांगोला पोलिसांनी (Sangola Police) जेरबंद केले आहे.

सोशल मीडियावर तरुणीची बदनामी! पंजाबचा तरुण जेरबंद
कोरे चेक घेऊन वकिलाने केली महिलेची बारा लाखांची फसवणूक!

याबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सांगोला तालुक्‍यातील एका मुलीशी लूडो गेम खेळत असताना चॅटिंगद्वारे पंजाबमधील लखना थापा (ता. पट्टी, जि. तरण तारण) येथील अमनदीप करम सिंग (वय 23) याने या मुलीचा विश्वास संपादन केला. नंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन तिच्याशी मैत्री संपादन केली. पुढे जाऊन तो व्हाटसऍप, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे तिला व्हिडिओ कॉल करू लागला. हे व्हिडिओ कॉल तो रेकॉर्ड करायचा. हे तयार केलेले व्हिडिओ त्याने संबंधित मुलीच्या नातेवाइकांना तसेच यूट्यूब, इन्स्टाग्राम व कॉलेजमधील ग्रुपवर पाठवून दिले. हे कृत्य करून आरोपीने संबंधित मुलीची बदनामी केल्याची फिर्याद सांगोला पोलिसात दाखल करण्यात आल्यानंतर सांगोला पोलिसांनी कौशल्याने तांत्रिकदृष्ट्या तपास करून या गुन्ह्यातील संशयित आरोपी अमनदीप करम सिंग यास पंजाबमधील त्याच्या गावात जाऊन त्याचा शोध घेत अटक केली आहे.

सोशल मीडियावर तरुणीची बदनामी! पंजाबचा तरुण जेरबंद
तीन पथके नेमूनही लागेना वैरागच्या शिवराजचा शोध!

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोल्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप हे तपास करीत आहेत. या तपासकामी पोलिस उपनिरीक्षक संदेश नाळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल वजाळे, पोलिस नाईक अभिजित मोहोळकर, सुखदेव गंगणे, बाबासाहेब पाटील, सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अन्वर आतार यांनी मदत करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. या आरोपीवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आजच्या तरुण पिढीवर समाज माध्यमांची मोठी भुरळ आहे. मात्र याच्या अनिर्बंध व अविचारी वापरामुळे नवनवीन प्रकारचे गुन्हे घडत आहेत. याबाबत पालकांनी व समाजाने जागृत राहणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.