मराठा समाजाला आंदोलकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
मंगळवेढा (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सोलापूर येथे काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी (Maratha Aakrosh Morcha) मंगळवेढ्यातुन सोलापूरला जात असलेल्या आ. समाधान आवताडे (MLA samadhan autade) यांच्याबरोबर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आंदोलकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या. (police have arrested the protesters along with MLA samadhan autade who was going to solapur for maratha aakrosh morcha)
शांततामय मार्गाने 58 मोर्चे काढून देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नसल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर येथे संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येणार आहे. त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवेढा व सांगोल्यातून सोलापूर येथे जाणाऱ्या आंदोलकांना मंगळवेढा येथील सांगोला नाका, खोमनाळ नाका, बोराळे नाका, माचणूर, बेगमपूर, वाघोली, कामती, तिर्हे, बी.एम.आय.टी काॅलेज, देगाव गावाजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामध्ये आंदोलकांच्या गाड्यांची तपासणी करून 4 आंदोलकांना सोडण्यात येत आहे. अशा आंदोलकांच्या गाड्यांना सोडावे, या मागणीसाठी आ. समाधान आवताडे हे आक्रमक झाले.
अवताडे व पोलीस यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. आ.आवताडे व त्यांच्या सोबत असलेल्या आंदोलकांना देगाव येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोरेगाव एस.आर.पी कॅम्प येथे नेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याबरोबर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कौडूभैरी, संचालक राजेंद्र पाटील, गणेश गावकरे, भास्कर घायाळ, समाधान घायाळ, हर्षद डोरले, मोहन गोसावी, किशोर देशमुखे, देवीदास इंगोले, दिंगबर यादव, दिपक सुडके आदीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.