मौजमजेसाठी 29 टू-व्हीलरची चोरी; पोलिसांकडून चार जण ताब्यात

crime news
crime newsesakal
Updated on
Summary

उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

पंढरपूर (सोलापूर): पंढरपूर शहर पोलिसांनी मौजमजा करण्यासाठी मोटारसायकल चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीस शिताफीने पकडले. या आरोपींनी विविध गावांमधून चोरलेल्या तब्बल 29 मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

crime news
पंढरपूर परिसरातील तरुणांना विमा प्रतिनिधी होण्याची संधी!

पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण पवार आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक राजेंद्र मगदूम यांना पथक स्थापन करण्या विषयी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.कदम यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक तयार करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक श्री.पवार आणि श्री.मगदूम यांना या प्रकरणातील दोन आरोपी चंद्रभागा बस स्थानक परिसरात दोन आरोपी मोटारसायकल विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

crime news
पंढरपूर परिसरातील तरुणांना विमा प्रतिनिधी होण्याची संधी!

त्या माहितीनुसार त्यांनी तिथे सापळा लावून पोलिसांनी महेश कांतीलाल नवले (वय 21 रा.अकोले बुद्रुक, ता. माढा), सिद्धार्थ उर्फ अमर संजय मुसळे (वय 23 रा. परिते, ता. माढा) या दोघा आरोपींना अटक केली. त्यांनी चोरलेल्या 19 मोटरसायकल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केल्या. त्याशिवाय त्यांनी सदाशिव महादेव फडतरे ( वय 28, रा. तुंगत, ता. पंढरपूर) आणि सोमनाथ उर्फ दादा दिलीप वाघमारे ( वय 22, रा. कंदर, ता. करमाळा) यांच्याकडे विक्री करण्यासाठी काही मोटर सायकल दिल्या असल्याचे सांगितले. पोलिसांनी फडतरे आणि वाघमारे यांच्या ताब्यातून 9 मोटारसायकली ताब्यात घेतल्या.

crime news
मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गावरील अपघातात खटावातील एकाचा मृत्यू

याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या कडून ताब्यात घेण्यात आलेल्या मोटरसायकल पंढरपूर, इंदापूर, वालचंदनगर, बारामती, कुर्डुवाडी, नातेपुते, माळशिरस, यवत, भोसरी, सांगली आदी शहरातून चोरण्यात आल्या होत्या. पंढरपूर शहर पोलिसांनी गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध भागातून चोरलेल्या 111 मोटरसायकल जप्त केल्या आहेत.

crime news
संचारबंदीला पंढरपूर व्यापारी महासंघाचा विरोध !आंदोलनाचा निर्धार

उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि त्यांच्या पथकातील सहकारी यांनी या प्रकरणाचा तपास केला. या शोध पथकात शरद कदम, बिपिनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, इरफान मुलांणी, इरफान शेख, शोएब पठाण, महेश पवार, संजय गुटाळ, सुनील बनसोडे, सुजित जाधव, समाधान माने, विनोद पाटील, अर्जुन केवळे, अन्वर दातार यांचा सहभाग होता. याप्रकरणी पुढील तपास सुनिल बनसोडे आणि महेश पवार हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.