सोलापूर : चिखली (जि. कोल्हापूर) गावातील शेतकरी कुटुंबातील सर्जेराव बाजीराव पाटील यांना चार बहीणी. वडील सुधारणावादी आणि सुशिक्षित असल्याने मुलांना चांगले शिक्षण देऊन नोकरी लावण्याचे त्यांचे स्वप्न. लहानपणापासूनच सर्जेरावांना खाकीचे आकर्षण. त्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. घरातूनही प्रोत्साहन मिळाले आणि महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते कोल्हापूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले. त्यांना लेक्चरर म्हणून आणि विभागप्रमुख संधी मिळाली. परंतु, त्यांचे पोलिस होण्याचे स्वप्न असल्याने 1991 मध्ये 'एमपीएससी'च्या माध्यमातून ते पोलिस उपनिरीक्षक झाले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्जेरावांना ठाणे जिल्ह्यातील तुर्भे पोलिस ठाण्यात नियुक्ती मिळाली. फौजदार म्हणून रूजू झाल्यानंतर काही दिवसांतच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खूनाचा तपास त्यांच्याकडे आला. खुनाचा कसलाच मागमूस नसतानाही त्यांनी तो तपास कौशल्याने पूर्ण केला. प्रशिक्षणार्थी असतानाच खुनाचा गुन्हा उघड केल्याने वरिष्ठांसह सहकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यानंतर 1992 ते 2003 या काळात नवी मुंबईत त्यांना पोस्टिंग मिळाली. त्याठिकाणी संतोष शेट्टी या कॉंग्रेस अध्यक्षावर छोटा राजनच्या गॅंगस्टरमधील भास्कर शेट्टी याने हल्ला केला. त्यानंतर तो कोणालाच मिळून येत नव्हता. त्याचे चांगलेच वजन असल्याने त्याच्या विरूध्द कारवाईदेखील होत नव्हती. अशावेळी सर्जेराव हे आपल्या पथकासह नवी मुंबईतून थेट कर्नाटकातील मेंगलोर येथे गेले. 10 ते15 दिवसांचा मुक्काम करून त्यांनी भास्कर शेट्टीला अटक करून मुंबईत आणले. त्यानंतर ठाणे मध्यवर्ती बॅंक लुटणाऱ्या सर्व आरोपींना काही तासांतच अटक करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा लावण्यात महत्वाची कामगिरी पार पाडली. या कामगिरीमुळे गुन्हेगारांमध्ये त्यांचा चांगलाच वचक निर्माण झाला. नवी मुंबईतील गुन्हे शाखेत असताना न्हावाशेवा येथील एका आयएएस अधिकाऱ्याचा खून, बनावट डॉलर प्रकरणाचा त्यांनी छडा लावला. त्यानंतर पोलिस महासंचालकांच्या आदेशाने राज्यातील नवी मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, मुंबई या ठिकाणी खंडणी विरोधी पथक निर्माण केले. नवी मुंबईतील खंडणी विरोधी पथकात त्यांना संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी विनोद ठाकूर या सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून एकाचवेळी 80 सायकली आणि 20 घरफोड्यांचे गुन्हे उघड केले. अंमली पदार्थविरोधी मोहिमेत सहा कोटीचा चरस जप्त करण्याचीही कामगिरी त्यांनी पार पाडली.
गुन्ह्यांचा अचूक तपास
वाशी येथे रिलायन्स समुहाच्या उपाध्यक्षांच्या पत्नीचे सोने लुटून तिचा खून झाला होता. हायप्रोफाईल खून मोठा गाजला होता. त्या गुन्ह्याचा तपास त्यांनी अवघ्या काही तासांत लावला. बिहारमध्ये जाऊन त्यांनी संपूर्ण सोने जप्त करून सर्व आरोपींना बेड्या ठोकून वाशीला आणले होते. त्यांनाही जन्मठेपेची शिक्षा लागली. वाशीतील एका व्यापाऱ्यावर दरोडा टाकणाऱ्या आरोपींनाही ताबडतोब जेरबंद करण्यात यश मिळाले. त्यानंतर मुंबईत विशेष सुरक्षा विभागात त्यांनी तीन वर्षे सेवा बजावली. पुन्हा रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्यात पदोन्नतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून जबाबदारी मिळाली. रेवदंडा येथील कोळी बांधवांनी कोळसा विरोधी आंदोलन केले होते. त्यांनी ते अत्यंत कौशल्याने हाताळून शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळवले. त्यामुळे वरिष्ठांनी त्याचे कौतुक केले. रेवदंडा परिसरातील खुनांचा तपासही त्यांनी तत्काळ लावला. त्यानंतर पुणे ग्रामीणमधील लोणीकंद येथे बदली झाल्यानंतर एका व्यक्तीचा क्रुरपणे खुन करणाऱ्या आरोपीचा तपास करून त्याला जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी सर्जेरावांचे योगदान मोठे राहिले. दरम्यान, महामार्गावर लग्नाच्या आधी वरात काढण्याचा प्रकार होता. त्यामुळे अनेकदा रस्ता बंद ठेवावा लागत होता. हा प्रकार त्यांनी बंद केला. त्यानंतर आषाढीनिमित्त वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला पळवून नेवून लुटमार करणाऱ्या टोळीलाही त्यांनी जेरबंद केले. 2010 मध्ये पोलिस निरीक्षक म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. हिंगोलीतील वसमत येथे त्यांची नियुक्ती झाली. तेथे सण, उत्सव जयंती मोठ्या प्रमाणात साजरे व्हायचे. त्यावेळी तेथे दंगली होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायम निर्माण होत होता. ही परंपरा मोडीत काढून वसमतमध्ये कायद्याचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही सण, उत्सवात त्यानंतर कोणताच अनुचित प्रकार झाला नाही. लोकांमध्ये जावून लोकांशी संपर्क वाढवून ही किमया त्यांनी साधली. वसमतमध्ये एका गुन्हेगाराने हैदोस माजवला होता. त्यासाठी ऑपरेशन छालासिंग तयार करून त्याला अटक करून संपूर्ण गावातून त्याची मिरवणुक काढून त्याची दहशत मोडीत काढली. त्यामुळे लोकांनी पोलिसांना अक्षरक्ष: डोक्यावर घेतले. तीन वर्षांच्या वसमतमधील कारर्किदीत लोकांसाठी चांगले काम केले. सात वर्षानंतर तेथे गेल्यावर प्रसिध्द झेंडा चौकात लोकांनी एका वजनकाट्यात सर्जेरावांना बसवले आणि दुसऱ्या वजनकाट्यात लाडू रचून लाडूने तुला करीत त्यांचा लोकांनी सन्मान केला. त्यानंतर त्यांची बारामती शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली. काही दिवसांनी एका इसमाचा खून माजी नगराध्यक्षाने केला होता. त्याचा तपासही त्यांनी लावला. बारामतीतील धनगर आरक्षणाला कोणतेही गालबोट लागणार नाही, यादृष्टीने चोख बंदोबस्त केला. बारामतीला दोनवेळा पंतप्रधान आणि एकवेळा राष्ट्रपती आले. त्यावेळीही यशस्वीपणे बंदोबस्त पार पाडला. सर्वांत महत्वाचे म्हणजे भिमा कोरेगांवच्या स्मृती स्तंभाजवळ शांतता प्रस्थापित करण्याचे महत्वाचे काम यशस्वीपणे पार पाडले. 2018 मध्ये सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलात आल्यानंतर बार्शी पोलिस ठाण्याचा पदभार मिळाला. संवेदनशील बार्शी मतदारसंघात विधानसभा आणि लोकसभा, करमाळा विधानसभा या निवडणुका शांततेत पार पाडून कौशल्याने कर्तव्य पार पाडले. एका व्यापाऱ्याचे 10 लाख रूपये दरोड्यात गेले होते. त्यातील आरोपीला जेरबंद करून गुन्हा उघड केला. उत्तर प्रदेशातील गॅंगस्टर आरोपी बार्शीत राहात होता. त्याच्यावर पाच लाखांचे बक्षिस होते. त्यालाही पकडून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. 2019 मध्ये सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्याठिकाणी एका लहान मुलाला किडनॅप करून त्याचा खून झाला होता. त्यातील आरोपींनी त्या मुलाच्या वडीलांकडे दोन कोटींची खंडणी मागितली होती. त्यांनी या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली. मेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोकरीचे आमिष दाखवून दोन तरूणांकडून पैसे घेवून त्यांच्या आई- वडीलांचा खून करण्यात आला होता. तो गुन्हाही उघड करण्यात यश आले.
सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी
2 जानेवारी 2021 पासून त्यांची सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती झाली. वडाळ्यातील डॉक्टराचे अपहरण, मंद्रुप, सांगोला व जिल्ह्यातील अन्य ठिकाणचे दरोडे, चोऱ्या, लुटमारीचे जवळपास 160 गुन्हे उघड करून 197 आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन कोटी 45 लाख 71 हजार 849 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली 'ऑपरेशन परिवर्तन' राबवून अनेकांना सन्मार्गावर आणले. अवैध व्यवसायातील व्यक्तींना सन्मानाने जगण्यासाठी मदत केली. सर्जेरावांनी 32 वर्षांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात काम केले. त्यांना 2014 मध्ये पोलिस महासंचालकांचे पदक तर 2017 मध्ये राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले. 32 वर्षांच्या काळात त्यांना जवळपास 600 पेक्षा अधिक रिवार्ड मिळाले. 'आधी लगीन कोढांण्याचे, मग रायबाचे' ही प्रतिज्ञा घेऊन स्वराज्याचे शिलेदार नरवीर तानाजी मालुसरे हे अजरामर झाले. त्यांची आठवण ठेवूनच सर्जेरावांनी पोलिस दलात आल्यानंतर प्रथम खाकी वर्दी आणि नंतर बाकीचे काम, असे ठरवून कर्तव्य बजावले. आई नर्मदा आणि वडील बाजीराव, पत्नी मनिषा व इंद्रजित आणि सौरभ या दोन मुलांच्या सहकार्यामुळेच ते शक्य झाल्याचे भावनिक उद्गारही त्यांनी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने काढले. निवृत्तीनंतर आपण शेतीकडे लक्ष देणार असून चिखलीकर ट्रस्टच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन वर्ग सुरू करणार असल्याचा मनोदय ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.