नातेपुतेच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

नातेपुतेच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
नातेपुतेच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
नातेपुतेच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेगCanva
Updated on
Summary

माळशिरस तालुक्‍यात नव्याने स्थापन झालेल्या अकलूज नगरपरिषद व महाळुंग, नातेपुते नगर पंचायतीच्या निवडणुका काही महिन्यांत होऊ शकतात.

माळशिरस (सोलापूर) : माळशिरस (Malshiras) तालुक्‍यात नव्याने स्थापन झालेल्या अकलूज (Akluj) नगरपरिषद व महाळुंग (Mahalung), नातेपुते (Natepute) नगर पंचायतीच्या निवडणुका काही महिन्यांत होऊ शकतात, हे लक्षात घेऊन प्रत्येक गट आपापल्या परीने गट बांधणीच्या कामाला सुरवात केली आहे. जिल्हा परिषदेचे (Solapur ZP) माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख (Babaraje Deshmukh), मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे (Mamasaheb Pandhare), पंचायत समिती सदस्य माऊली पाटील (Mauli Patil) यांनी निवडणुकीच्या दृष्टीने बालाजी दर्शन यात्रा करून त्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. उर्वरित कार्यकर्त्यांना घेऊन नुकताच त्यांनी महाबळेश्वर (Mahabaleshwar) दौराही केला आहे.

नातेपुतेच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा मोहिते-पाटील!

आमदार राम सातपुते, भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते- पाटील यांनी नातेपुते येथे प्रवीण काळे यांच्या निवासस्थानी आपल्या समर्थकांची बैठक घेऊन भाजपच्या चिन्हावर नगरपंचायतीच्या निवडणुका लढवाव्यात, असा आग्रह धरला आहे. परंतु नातेपुते शहरात भाजपमध्ये म्हणजेच मोहिते-पाटील समर्थकांमध्ये दोन गट असून, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांचा एक गट व माजी सरपंच ऍड. भानुदास राऊत यांचा एक गट पारंपरिकरित्या स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात लढत असतात. माजी पोलिस पाटील राजेंद्र पाटील, कै. रघुनाथ उराडे, कै. रामचंद्र भांड आणि ऍड. भानुदास राऊत या चौघांचा एक पॅनेल पूर्वी असे. या चारही गटात वैचारिक मतभेद होऊन यातील एकसंधपणा आज राहिलेला नाही.

ही निवडणूक भाजप चिन्हावर लढवायला ऍड. भानुदास राऊत यांच्या गटाची तयारी आहे. परंतु, बाबाराजे देशमुख यांच्या गटामध्ये समाविष्ट असणाऱ्या अनेकांची पक्षाच्या चिन्हावर लढण्याची मानसिकता दिसून येत नाही. तरीही शिवरत्न बंगल्यावरून काही विशेष तडजोडी झाल्या तर नातेपुते नगरपंचायतीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होऊ शकते. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाने आपापली आघाडी स्थापन करून निवडणूक आयोगाकडे नोंदणीसाठी पाठवली आहे, अशीही चर्चा शहरात आहे. राजकीय पक्षावर तडजोड होईल, असे कुणालाही वाटत नाही. प्रत्येकजण आघाडी करूनच आपला राजकीय सवतासुभा बाजूला ठेवून वेगळा गट करून निवडणूक लढवणार असल्याचे चित्र आहे.

नातेपुतेच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
राष्ट्रवादीकडे मामा पण कॉंग्रेसकडे साहेब अन्‌ ताई!

विजयाची माळ कोणत्या कार्यकर्त्याला जवळ केले तर गळ्यात पडेल, त्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले दिसून येत आहेत. याउलट देशमुख गटाच्या विरोधात एकही जण खंबीरपणे कोणत्याही प्रभागात निवडणूक लढवणार, हे अजूनही ठरवू शकत नाहीत. नातेपुते नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे ग्रामस्थांना वाटते. याउलट पहिलीच निवडणूक असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यास वाटते की, माझ्या प्रभागात माझेच राजकीय आणि जातीचे वर्चस्व आहे. त्यामुळे बिनविरोधचा प्रयत्न यशस्वी होईल, असे वाटत नाही.

बाबाराजे देशमुख यांचा गट

बाबाराजे देशमुख यांच्या संघटन चातुर्यामुळे आणि सर्वांना सामावून घेण्याच्या भूमिकेमुळे आज देशमुख यांच्या गटामध्ये माजी उपसरपंच अतुल पाटील, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, संदीप ठोंबरे आणि अजय भांड, कै. रघुनाथ उराडे यांचे चिरंजीव विजय, भारत त्यांच्यासोबत असून अहिल्यादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कवितके यांचाही गट त्यांच्यासोबत आहे.

अ‍ॅड. भानुदास राऊत यांचा गट

अ‍ॅड. भानुदास राऊत हे एकाकी नेतृत्व करीत असून, त्यांना भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण काळे, माजी गटनेते दादासाहेब उराडे हे गट मनापासून साथ देताना दिसतात. तसेच काळे मळा व पांढरे मळ्यातील काही असंतुष्ट कार्यकर्तेही त्यांना साथ देतात. मागील निवडणुकीत त्यांनी बहुतेक जागा लढून आपले अस्तित्व दाखवून दिले होते. अनेक ठिकाणी अल्प मतांनी त्यांचे उमेदवार पराभूत झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.