मंगळवेढा : सुडाच्या राजकारणामध्ये रमलेल्यांना राज्यकर्त्यांना शेतकऱ्याच्या वेदना समजून घेण्यात व अश्रु पुसण्यात वेळच नसल्याचे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल साळुंखे यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेतील पारितोषिक वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,पोलीस निरीक्षक रणजित माने,मुख्याध्यापक कांतीलाल इरकर,बापूसाहेब मेटकरी,संजय मस्के,कविराज दत्तू, सुभाष मस्के ,संगमेश्वर मस्के, विलास पाराध्ये, वाल्मिकी लोखंडे, तुकाराम मस्के,विकास अवघडे,प्रवीण साठे ब्रह्मदेव वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अॅड साळुंखे म्हणाल्या की,हजारो रूपये खर्चून उत्तर महाराष्ट्र,कोकण,पश्चिम महाराष्ट्रात घेतलेली पिके,फळ बागा या गारपीट व अवकाळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्याच्या अश्रुचा बांध फुटला, तेव्हा खरी गरज असते ती आधाराची आणि शासकीय मदतीची, शासकीय मदत देवून त्याचे अश्रु पुसण्याची गरज असताना म राजकीय उखाळ्या पाकाळ्या काढण्यात लोकप्रतिनिधी धन्यता मानत आहे.
आदीच्या नुकसान भरपाईची मदत सरकारी नियम व फायली प्रवासात कागदावर अडकून पडली आहे.यातून शेतकऱ्यालाच कुणी वाली नसल्याचे सिध्द होत आहे.निसर्गाकडून होणारा अन्याय, शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी पिचला,मात्र क्रिकेटच्या लिलावात करोडोची बोली लावली जाते म्हणून शेतकऱ्यालाच क्रिकेटर केले.निदान त्या लिलावात चार पैसे अधिकचे मिळतील,अशी परिस्थिती निर्माण झाली.
सध्या जग बदलत तो बदल आजच्या तरूणांनी समजून घेतला पाहिजे.माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे बोलताना म्हणाले कि, पुस्तक उशाला ठेवून स्पर्धा परीक्षा यशस्वी होता येत नाही त्या प्रमाणे बॅट उशाला ठेवून चांगले क्रिकेटर ही होता येत नाही,त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात,तरच यशस्वी होता येते.
सैराट बघायला हरकत नाही मात्र आपले गुण कमी होणार नाही यांची काळजी घेण्याची गरज आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रणजीत माने बापूसाहेब मेटकरी व कविराज दत्तू यांची भाषणे झाली क्रिकेट स्पर्धेत फायटर क्लब नंदेश्वर, डीसीसी डोंगरगाव आणि मारापुर या संघाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.