Breaking ! सिद्धेश्‍वर कारखाना बंद करण्याचे प्रदूषण मंडळाचे आदेश

Breaking ! सिद्धेश्‍वर कारखाना बंद करण्याचे प्रदूषण मंडळाचे आदेश
Breaking ! सिद्धेश्‍वर कारखाना बंद करण्याचे प्रदूषण मंडळाचे आदेश
Breaking ! सिद्धेश्‍वर कारखाना बंद करण्याचे प्रदूषण मंडळाचे आदेशesakal
Updated on
Summary

सिद्धेश्‍वर साखर कारखान्याने को-जनरेशन करताना कारखान्याने पर्यावरण विभागाची संमतीच घेतली नसल्याचे आता समोर आले आहे.

सोलापूर : महापालिकेची अथवा विमानतळ विकास प्राधिकरणाची (Airport Development Authority) कोणतीही परवानगी न घेताच श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याने (Siddheshwar Sugar Factory) को-जनरेशनची 90 मीटर चिमणी (Chimney) उभारली आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर चिमणी पाडकामाची कार्यवाही महापालिकेने हाती घेतली आहे. न्यायालयातील दोन याचिकांमुळे तूर्तास चिमणी पाडकाम थांबले आहे. परंतु, आता को-जनरेशन करताना (एक्‍स्पॉन्शन) कारखान्याने पर्यावरण विभागाची (Department of Environment) संमतीच घेतली नसल्याचे आता समोर आले आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) कारखान्याला 96 तासांची मुदत दिली असून, मुदत संपण्यापूर्वी कारखाना बंद करा, अन्यथा कायदेशीर कारवाईचे पत्र दिले आहे.

Breaking ! सिद्धेश्‍वर कारखाना बंद करण्याचे प्रदूषण मंडळाचे आदेश
MPSC वयोमर्यादा वाढीला आचारसंहितेची बाधा! अर्जाची वाढेल मुदत

श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची को-जनरेशनची चिमणी होटगी रोडवरील विमानतळासाठी अडथळा ठरली आहे. चिमणीमुळे विमानसेवा सुरू होत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. परंतु, त्यासाठी मागील काही वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. 2017 मध्ये चिमणी पाडकामाचा प्रयत्न झाला, परंतु त्यावेळी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले होते. दरम्यान, संजय थोबडे यांनी त्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. त्यांनीच राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. राष्ट्रीय हरित लवादाकडे कारखान्याकडून होत असलेल्या प्रदूषणाची गंभीर दखल घेण्यात आली.

Breaking ! सिद्धेश्‍वर कारखाना बंद करण्याचे प्रदूषण मंडळाचे आदेश
महापालिका शाळांचा आज निर्णय! दोन सत्रात भरणार शाळा

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाला त्यांनी त्यासंबंधीचा अहवाल मागविला होता. त्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झाले असून राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा आधार घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी कारखान्याला पत्र पाठवून पुढील 96 तासांत कारखाना बंद ठेवावा, असे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात कारखान्याने चिमणी पाडकामाला मागितलेल्या स्थगितीवर सुनावणी होणार आहे. त्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.