जाचक अटींमुळे जीवनदायी योजना ठरताहेत कुचकामी ! रुग्णांचे आरोग्य वाऱ्यावर

जाचक अटींमुळे जीवनदायी योजनांचा गरीब रुग्णांना मिळेना लाभ
Doctor
DoctorEsakal
Updated on

वैराग (सोलापूर) : जाचक अटीमुळे "महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना' (Mahatma Jotiba Phule Jivandayee Yojana) रुग्णांसाठी अडचणीची ठरत आहे. योजना असूनही ती कुचकामी ठरत आहे. त्यामुळे गरीब रुग्ण योजनेपासून वंचित राहात आहेत. (Poor patients do not get life saving plans due to oppressive conditions)

राज्य सरकारने सर्व खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड रुग्णांकरिता आरक्षित केले. मात्र, असे असले तरी गरीब घटकातील रुग्णांच्या बिलांसाठी मात्र कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. सरकारची महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना ही जाचक अटींमुळे असून अडचण व नसून खोळंबा ठरली आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जीवनदायी योजना प्रकत्रितपणे सध्या राबविल्या जात आहेत.

Doctor
रेमडेसिव्हीरचा काळाबाजार ! तिघे पोलिसांच्या जाळ्यात; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

राज्यातील सर्वच आर्थिक उत्पन्नाच्या गटातील नागरिकांना योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने मागील वर्षी घेतला होता. यात कोरोना व इतर आजारांच्या रुग्णांचाही समावेश आहे. जीवनदायी योजनेत "996' तर पंतप्रधान जन आरोग्य योजनेत 1 हजार 200 आजारांवर उपचार केले जातात. योजना वरवर आकर्षक वाटत असली, तरी प्रत्यक्षात मात्र ती अमलात आलेली नाही, असे दिसते. सरकारने कोरोना (Covid-19) रुग्णांच्या उपचाराकरिता त्यात काही जाचक अटी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये बिलातून कोणताही दिलासा मिळत नसल्याने वास्तव समोर आले आहे.

Doctor
लॉकडाउनमध्ये गरिबांसाठीचे धान्य काळ्याबाजारात ! करमाळ्यातील दोन रेशन दुकाने सील

"या' आहेत जाचक अटी

ऑक्‍सिजन पातळी 94 च्या खाली असेल तरच लाभ. रेमडेसिव्हीर तसेच इतर महागड्या औषधांचा त्यात समावेश नाही. अशा जाचक अटी या योजनेत असल्याने रुग्णांसाठी अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे गरीब रुग्ण उपचाराविना राहात असल्याचे चित्र दिसत आहे. रुग्णांसाठी ही योजना फलदायी अशी आहे; मात्र काही जाचक अटी शिथिल केल्यास रुग्णांसाठी याचा फायदा होईल.

- डॉ. जयवंत गुंड, वैद्यकीय अधिकारी, वैराग प्राथमिक आरोग्य केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.