आता लढा इंदापुरातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी : देशमुख

प्रभाकर देशमुख म्हणाले, आता इंदापुरातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करणार
Prabhakar Deshmukh
Prabhakar DeshmukhCanva
Updated on
Summary

देशमुख म्हणाले, इंदापूरच्या शेतकऱ्यांनाही पाणी पाहिजे त्यात दुमत नाही; पण त्यांच्या हक्काचे मंजूर झालेले सात टीएमसी पाणी कुठे आहे? त्याचा वापरकर्ता कोण आहे? याचा तपास लावायचा आहे.

मोहोळ (सोलापूर) : उजनी धरणातील (Ujani Dam) पाच टीएमसी पाण्यासाठी लढा उभा केला नसता किंवा आंदोलन केले नसते तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागला असता. भविष्यात शेती विकावीच लागली असती. हा लढा इथेच संपला नाही. आता इंदापूरच्या (Indapur) शेतकऱ्यांसाठी लढा उभारला जाईल, असे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh, President of Janhit Shetkari Sanghatana) यांनी सांगितले. (Prabhakar Deshmukh said that will agitate for farmers of Indapur for their right to water)

Prabhakar Deshmukh
अखेर उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द ! जलसंपदा विभागाचा लेखी आदेश

उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय गुरुवारी (ता. 27) रद्द करण्यात आला. त्यासंदर्भात बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले, जनहित शेतकरी संघटना ही संघर्ष करणारी संघटना आहे. खडकवासला धरणातून यापूर्वी इंदापूर तालुक्‍यासाठी 22 गावांना खासदार शरद पवार यांच्या प्रयत्नाने सात टीएमसी पाण्याची तरतूद केली होती. त्याला मंजुरी आहे. मात्र 22 गावांना पाणी मिळाले नाही. योजना मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऊस लावावा असेही सांगण्यात आले होते. त्या सात टीएमसी पाण्यासाठी आता पुढील आठवड्यात इंदापूर तहसील कार्यालयासमोर इंदापूरच्या शेतकऱ्यांसाठी अंदोलन करण्यात येणार आहे.

Prabhakar Deshmukh
नवीन नोकरी शोधत आहात? कुठे जॉईन होत आहात? तर या गोष्टी ठेवा लक्षात

सात टीएमसी पाणी आजपर्यंत कोण वापरतोय, शेतकऱ्यांना पाणी का मिळाले नाही, यासाठी येत्या आठवडाभरात इंदापूरच्या शेतकऱ्यांसाठी व सात टीएमसी पाणी वापराला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची आमची मुख्य मागणी असेल. शेवटी इंदापूरचेही शेतकरीच आहेत, त्यांनाही पाणी पाहिजे त्यात दुमत नाही; पण त्यांच्या हक्काचे मंजूर झालेले सात टीएमसी पाणी कुठे आहे? त्याचा वापरकर्ता कोण आहे? याचा तपास लावायचा आहे. उजनीतील संपूर्ण पाण्याचे वाटप झाले आहे तरीही उजनीवर वाकडी नजर का? त्यासाठी येत्या अधिवेशनात उजनी धरणासंदर्भात कायदा करण्याची आपली मागणी असणार आहे; जेणेकरून भविष्यात उजनीच्या पाण्यासाठी कोणाला तलफ होऊ नये, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.