Crop Insurance : शेवटच्या दिवशीच पीक विम्याचा Server Down; शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार?

ज्वारी या पिकाचा विमा भरण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर होती.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana Crop Insurance Server Down
Pradhan Mantri Fasal Bima Yojana Crop Insurance Server Downesakal
Updated on
Summary

रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकाला 15 डिसेंबर पर्यंत मुदत दिली जाते, मग ज्वारीसाठी 30 नोव्हेंबरचीच मुदत का?

मंगळवेढा : प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या (pradhan mantri fasal bima yojana) रब्बी हंगामातील पीक विमा भरण्याचे सर्व्हर अंतिम दिवशीच डाऊन (Server down) झाल्यामुळे ज्वारीचा पीक विमा (Crop Insurance) भरण्यापासून शेतकरी वंचित राहिले. ज्वारीचा विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतील रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, भुईमूग या पिकांचा विमा 1 रूपयात भरण्यासाठी शासनाच्या वतीने जाहिरातीव्दारे माहिती प्रसिद्ध केली. त्यामुळे ज्वारी या पिकाचा विमा भरण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर होती व इतर पिकांसाठी 15 डिसेंबर ही तारीख निश्चित केली.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana Crop Insurance Server Down
Siddaramaiah : शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार दोन हजार रुपये; राज्य सरकारकडून पीक नुकसानभरपाईची घोषणा

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पीक विमा भरण्याच्या सर्व्हरमध्ये आधारचा सर्व्हर नाॅट वर्किंग झाल्याने शेतकरी विमा भरण्यासाठी सी.एस.सी केंद्रात रांगा लावून थांबले. मात्र, शासनाकडून मुदतवाढी संदर्भात कोणतेही परिपत्रक अद्याप प्रसिद्ध न झाल्यामुळे शेतकरी ज्वारीचा पीक विमा भरण्यापासून वंचित राहिले.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana Crop Insurance Server Down
Tasgaon : अवकाळी पावसामुळे द्राक्ष शेतीचे मोठे नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

गतवर्षी तालुक्यातील 68 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यंदा मात्र ती संख्या अतिशय कमी आहे. मात्र, फक्त आंधळगाव व भोसे या दोनच महसूल मंडलचा पीक विमा जमा झाला. उर्वरित सहा मंडले अद्याप पीक विम्याच्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचा विमा कधी जमा होणार हा देखील प्रश्न या निमित्ताने अनुत्तरीत आहे.

दोन दिवसांत अवकाळी पावसाने केलेल्या रब्बी पिकाच्या नुकसानीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने पंचनामाचे आदेश दिले असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर येथे अधिकारी फिरकले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एका बाजूला निसर्गाची अवकृपा, तर दुसऱ्या बाजूला विमा कंपनीची सर्व्हर डाऊन होणे यामुळं तालुक्यातील शेतकरी भरडला जात आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana Crop Insurance Server Down
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; जरांगे-पाटलांच्या आदेशाचं पालन करत गावा-गावांत साखळी उपोषण सुरु

रब्बीत तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारी पिकाचे असून अवकाळीने तालुक्यातील शेतकऱ्यांची कंबरडे मोडले. त्यांना आधार देण्यासाठी शासनाने ज्वारीचा पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे.

-बिरूदेव घोगरे, सरपंच, निंबोणी

रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकाला 15 डिसेंबर पर्यंत मुदत दिली जाते, मग ज्वारीसाठी 30 नोव्हेंबरचीच मुदत का? रब्बी हंगामातील सर्व पिकांना एकाच दिवशी विमा भरण्याची मुदत अंतिम देणे आवश्यक आहे. अखेरच्या दिवसांत सर्व्हर डाऊन होण्याची ही परंपरा नेहमीची झाली.

-प्रशांत साळे, तालुकाध्यक्ष काॅंग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.