छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजें नी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे. त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज उद्या कोल्हापुरात जाणार आहेत.
सोलापूर : छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात, ऐतिहासिक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या 'मराठा क्रांती मूक आंदोलनात' वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. (prakash ambedkar will participate in the kolhapur maratha revolution)
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजें नी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे. त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज उद्या कोल्हापुरात जाणार आहेत. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय दिला. देशात सर्वात पहिल्यांदा आरक्षण लागू केले. बाबासाहेबांना सर्वार्थाने मदत केली ती शाहू महाराजांनी. आणि डॉ बाबासाहेब आंबेडरांनी नेहमी शाहू महाराजांनी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा गौरव केला आहे.
अनेक अर्थांनी हा पाठिंबा अभूतपूर्व असणार आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात हा सामाजिक समतेचा आणि एकोप्याचा संदेश जाईल.(prakash ambedkar will participate in the kolhapur maratha revolution)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.