सोलापूर : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 21 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात होईल. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सोमवारी (ता. 21) सायंकाळी सात वाजता ऑनलाइन पध्दतीने होणार आहे.
मराठी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, ज्येष्ठ कलावंत तथा दिग्दर्शक शशिकांत लावणीस, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, महानगर शाखेचे अध्यक्ष अजय दासरी यांची हुतात्मा स्मृती मंदिरात प्रमुख उपस्थिती असणार आहे. राज्य नाट्य स्पर्धेचे हे 60 वे वर्ष आहे. हिरक महोत्सवी ही स्पर्धा 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडेल. कोरोनामुळे नाट्य स्पर्धांवर निर्बंध होते. सांस्कृतिक मंत्री देशमुख व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या पाठपुराव्यामुळे संपन्न होत आहे. त्या निमित्ताने स्पर्धेच्या समन्वयिका ममता बोल्ली यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे. अतिशय माफक दरात (दहा-पंधरा रुपये) ही स्पर्धा प्रक्षेकांना पाहता येणार आहे.
प्राथमिक फेरीतील नाटके...
प्राथमिक फेरीच्या पहिल्या दिवशी हम पॉंच (लेखक: संकेत तांडेल, दिग्दर्शक: गिरीश देवकते), दुसऱ्या दिवशी गाजराची पुंगी (लेखक: यशवंत देशमुख, दिग्दर्शक: सय्यद अहमद), तिसऱ्या दिवशी कळा ज्या लागल्या जीवा (लेखक: प्रा. अनिल सोनार, दिग्दर्शक: सुमित फुलमामडी), चौथ्या दिवशी इंटू (लेखक व दिग्दर्शक: इम्तिायाज मालदार), पाचव्या दिवशी एम. आय. 171 (लेखक: डॉ. संजीव शेंडे, दिग्दर्शक: रत्नाकर जाधव), सहाव्या दिवशी अंत अस्तित्वाचा (लेखक व दिग्दर्शक नरेंद्र कोंगारी), सातव्या दिवशी शेवंता जित्ती हाय..! (लेखक: प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक: डॉ. दिनेश जाधव), आठव्या दिवशी रंग्या रंगीला रे (लेखक: योगेश सोमण, दिग्दर्शक: व्यंकटेश रंगम), नवव्या दिवशी डोंगरार्त (लेखक: अपर्णा क्षेमकल्याणी, दिग्दर्शक: डॉ. मीरा शेंडगे), दहाव्या दिवशी कंपल्शन टू कन्फेस (लेखक: जयप्रकाश कुलकर्णी, दिग्दर्शक: अश्विनी तडवळकर), अकराव्या दिवशी पाऊस पाड्या (लेखक: आदिल शेख, दिग्दर्शक: सागर देवकुळे), बाराव्या दिवशी अल्पविराम (लेखक: इरफान मुजावर, दिग्दर्शक: डॉ. सायली सुर्वे), तेराव्या दिवशी व्हॉट वुई आर! (लेखक, दिग्दर्शक विद्या काळे), 14 व्या दिवशी फकीरा (लेखक: सपना बावळे, दिग्दर्शक: स्वप्नील बावळे), 15 व्या दिवशी पाऊस (लेखक, दिग्दर्शक डॉ. गणेश शिंदे) आणि शेवटच्या दिवशी अग्निदिव्य-एक अमृतगाथा (लेखक: नागेंद्र माणकेरी, दिग्दर्शक: प्रथमेश माणकेरी).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.