खरीपाच्या पेरणीची तयारी जोरात!

biyane.jpg
biyane.jpg
Updated on
Summary

खरीपपूर्व मशागत चांगली होण्यास मदत झाली आहे. यामुळे आता खरीप पेरणीची तयारी सुरू असून वेळेवर पाऊस सुरू होणे आवश्‍यक आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातून (akkalkot taluka) चालू वर्षाच्या खरीप हंगामासाठी (kharif sowing) 85650 हेक्‍टर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली आहे. (preparation for kharif sowing have started from akkalkot taluka)

biyane.jpg
खरीप हंगाम गेला, आता मदार रब्बी हंगामावर

चालू हंगामात अक्कलकोट तालुक्‍यातील वागदरी, मैंदर्गी, किणी नागणसुर जेऊर, करजगी व तडवळ, मैंदर्गी, दुधनी या भागात पूर्वमौसमी पाऊस मध्यम स्वरूपाचा झाला आहे. त्याने खरीपपूर्व मशागत चांगली होण्यास मदत झाली आहे. यामुळे आता खरीप पेरणीची तयारी सुरू असून वेळेवर पाऊस सुरू होणे आवश्‍यक आहे.

biyane.jpg
अक्कलकोट पोलिसांसमोर आव्हान ! सलग दोन दिवस पेट्रोल पंपावर हजारो लिटर डिझेलची चोरी

अक्कलकोट तालुक्‍यातील मुख्य पिके ही खरीप हंगामात जास्त घेतली जातात. उन्हाळ्यात केलेली नांगरणी नंतर आता पेरणीचे दिवस आता आठवडभरात येत आहेत. त्याने शेतकरी बंधू कुळवणी, बियाणांची निवड तसेच खतांची खरेदी आदी कामे करत आहेत. आता येत्या चार पाच दिवसात मोठा पाऊस झाल्यास पुरेशी ओल होऊन पेरणी सुरू होण्याच्या कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

biyane.jpg
Breaking ! अक्कलकोट तालुक्‍यातील हालहळी येथे सोलापूरच्या युवकाचा जाळून निर्घृण खून

अक्कलकोट तालुक्‍यात खरीप हंगामात तूर 32000 हेक्‍टर , उडीद 19500 हेक्‍टर, मूग 7000 हेक्‍टर, सोयाबीन 4500 हेक्‍टर, सूर्यफूल 4100 हेक्‍टर, कांदा 1000 हेक्‍टर, ऊस 12500 हेक्‍टर असे एकूण 85650 हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे उद्दिष्ट अपेक्षित आहे.

खरीप हंगामात येणाऱ्या संभाव्य अडचणी जे पाहिजे ते बियाणे वेळेवर उपलब्ध न होणे, खतांची कृत्रिम टंचाई होणे अथवा जादा दराने विक्री करणे, जास्त नफा देणाऱ्या निविष्ठांचा विक्रीवर भर देणे, पावसातील नेहमीप्रमाणे असणारी अनियमितता मजुरांची नेमक्‍या कामावेळी भासणारी टंचाई खरीप पीक विमांची नोंदणी वेळेवर सुरु न करणे.

biyane.jpg
अक्कलकोट तालुक्‍यात दुपारी बारापर्यंत शिक्षक 32.78 तर पदवीधरसाठी 29.15 टक्के मतदान 
biyane.jpg
अक्कलकोट येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! रोख रकमेसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

"अक्कलकोट तालुक्‍यात तूर हे प्रमुख पीक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पूर्वी व रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करूनच बियाणे पेरणी करावी. त्यामुळे बियांपासून होणारे रोग कमी होतात व खताची बचत होते. सोयाबीनची पेरणी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करावी. बियाण्याची उगवण तपासणी करून पेरणी करावी. सोयाबीनची फार खोलवर पेरणी करू नये."

- सूर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी, अक्कलकोट

(preparation for kharif sowing have started from akkalkot taluka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.