सोलापूर : कोरोना (Covid-19) संसर्गाच्या काळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power) वाढविण्यासाठी व्हिटॅमिन म्हणून भाज्या, गोळ्या आणि महत्त्वाचे म्हणजे "क' जीवनसत्त्व (Vitami C) पदार्थांचे सेवन करण्याचा वैद्यकीय सल्ला सर्वांनाच दिला जात आहे. तेव्हा कडक उन्हाळ्यात "क' जीवनसत्त्व असलेल्या लिंबूंचे (Lemon) सेवन करण्याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मागणी वाढल्याने लिंबूच्या भावातही वाढ होऊन सोलापूर भाजी मार्केटमध्ये दोन नगाला 10 रुपये मोजावे लागत आहेत. (Prices of lemons containing vitamin C have increased significantly)
कडक उन्हाळा वाढू लागल्यामुळे सरबतासाठी लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे उत्तम प्रतीच्या लिंबाचा भाव सध्या बाजारात अक्षरशः प्रति दोन नग 10 रुपयांवर गेला आहे. मागील महिन्याच्या अखेरीस हे लिंबू 10 रुपयांना चार मिळत होते. मात्र आता ते दिवस गेले असे ग्राहक म्हणतात. एकीकडे मागणी वाढली असताना कमी उत्पादनामुळे लिंबूंची आवक कमी झाल्याने लिंबूच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून लिंबूची आवक होत असते. मात्र आठ दिवसांच्या कडक निर्बंधामुळे लिंबू घेणाऱ्यांची संख्या देखील अधिक असल्याने भाववाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या काळात लिंबूची मागणी वाढते. मात्र मागणीच्या तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध होत असते. दुसरीकडे कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून अनेकजण काळजी घेत असून, त्याचबरोबर दैनंदिन आहाराकडे लक्ष देत आहेत. त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नागरिक "क' जीवनसत्त्व असलेल्या लिंबूचा वापर करू लागले आहेत. आधीच उन्हाळ्यात लिंबूची मागणी वाढली असतानाच कोरोनामुळे लिंबूला मोठी मागणी येऊ लागली आहे.
सध्या लिंबूची आवक खूपच कमी झाली आहे. मात्र त्याचवेळी मागणीत मोठी वाढ झाली आहे. ही तफावत होऊ लागल्याने लिंबूचे दर प्रती दोन नग 10 रुपयांपर्यंत पोचले आहेत.
- अमोल गायकवाड, व्यापारी
कोरोना महामारीमुळे आणि उन्हाळ्यामध्ये सरबत व आहारामध्ये लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लिंबूमध्ये "क' जीवनसत्त्व असल्याने कोरोना काळात लिंबूचे दर वाढले आहेत. मागील महिन्यात दहा रुपयाला चार नग मिळत होते.
- संदीप पाटील, ग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.