Sharad Pawar Solapur Visit: शरद पवार अन्‌ नरेंद्र मोदी एकाच दिवशी सोलापूर दौऱ्यावर; घडामोडींना वेग

Sharad Pawar Solapur Visit: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगार, कष्टकरी जनतेचे घरकुलाचे स्वप्न साकार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गृहप्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. तर शरद पवार कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
Sharad Pawar Solapur Visit
Sharad Pawar Solapur VisitEsakal
Updated on

सांगोला : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगार, कष्टकरी जनतेचे घरकुलाचे स्वप्न साकार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गृहप्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. यामुळे हजारो कुटुंबांना हक्काचा निवारा मिळणार आहे. आज हजारो कामगार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. तर माजी कृषिमंत्री शरद पवार आज (ता. १९) सांगोल्यात येणार आहेत. स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या ’गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सव २०२४’च्या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत.

गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सव १९ ते २२ जानेवारीदरम्यान सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर संपन्न होणार आहे. या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी कृषिमंत्री शरद पवार भूषविणार आहेत तर शेकाप पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या शुभहस्ते उद्‌घाटन होणार आहे.

Sharad Pawar Solapur Visit
PM Modi Solapur Visit: पंतप्रधान मोदी आठवड्याभरात दुसऱ्यांदा राज्याच्या दौऱ्यावर; जगातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे करणार लोकार्पण

या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार पंडित पाटील व स्व. गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, आमदार रोहित पवार, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार संजय शिंदे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रणिती शिंदे, आमदार समाधान अवताडे, आमदार राम सातपुते, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, भाऊसाहेब रुपनर आदींसह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने इत्यादी राजकीय पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Sharad Pawar Solapur Visit
पंतप्रधान उद्या 60 मिनिटे सोलापुरात! CM, DCM, उच्च शिक्षण, गृहनिर्माण मंत्र्यांसह राज्यपालही येणार

या कृषी महोत्सवात शनिवारी (ता. २०) जैविक शेतीमाल उत्पादन यावर प्रफुल्ल घाडगे यांचे, रविवार (ता. २१) रोजी गोटा व्यवस्थापन व टीएमआर पद्धत या विषयावर रामराजे पाटील यांचे तर सोमवार (ता. २२) रोजी डाळिंब पोषण व संरक्षण या विषयावर प्रशांत नंदर्गीकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.

या कृषी महोत्सवाचे आयोजन डॉ. अनिकेत देशमुख युवा मंचाच्यावतीने करण्यात आले आहे. सांगोल्यातील कार्यक्रमानंतर शरद पवार मंगळवेढा तालुक्यात शिवाजी काळुंगे यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

Sharad Pawar Solapur Visit
Solapur : सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ; राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील योजना, उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.