राजकारणात समाजकारण केलेला नेता : प्रियांका गांधी

राजकारणात समाजकारण केलेला नेता : प्रियांका गांधी
राजकारणात समाजकारण केलेला नेता : प्रियांका गांधी
राजकारणात समाजकारण केलेला नेता : प्रियांका गांधीCanva
Updated on
Summary

प्रियांका गांधी-वढेरा म्हणाल्या, महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ आमदार राहिलेले माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली.

सोलापूर : शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख (Former MLA Ganpatrao Deshmukh) यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक राजकीय राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच प्रियांका गांधी-वढेरा (Priyanka Gandhi-Vadhra) यांनीही गणपतराव देशमुख यांच्या निधनानिमित्त शोक व्यक्त केला असून, त्यांच्या भावना ट्‌विटरवर पोस्ट केल्या आहेत. (Priyanka Gandhi pays homage to former MLA Ganpatrao Deshmukh-ssd73)

राजकारणात समाजकारण केलेला नेता : प्रियांका गांधी
आबांना मिळत होती सर्वाधिक पेन्शन! छदामही खर्चला नाही स्वत:साठी

प्रियांका गांधी-वढेरा म्हणाल्या, महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ आमदार राहिलेले माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. गणपतराव देशमुख यांनी राजकारणात समाजकारण केले. त्यांनी वंचित शेतकरी व कामगार वर्गासाठी आवाज उठवला. त्यांच्या या कृतीने देशात एक अद्वितीय उदाहरण घालून दिले आहे, अशा प्रतिक्रिया प्रियांका गांधी-वढेरा यांनी ट्‌विट केली आहे.

राजकारणात समाजकारण केलेला नेता : प्रियांका गांधी
"साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व हरपले'

शुक्रवारी रात्री माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावरून समजल्यावर सोशल मीडियावर फक्त आबासाहेबांचे फोटो व त्यांचे कर्तृत्व झळकत होते. याबाबत त्यांच्या आठवणींना उजाळा देताना विविध कमेंट्‌सही दिल्या जात होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार नरसय्या आडम यांनी व अनेक नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आज दुपारी भाईंवर अंत्यसंस्कार करण्यात येत असून, त्यासाठी नेते, कार्यकर्ते व चाहत्यांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी सांगोल्यात गर्दी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.