ZP School: जिल्हा परिषदेच्या शाळेवर सर्वसामान्यांचा वाढला विश्वास, अनेक विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

Solapur: पहिल्या दिवशी दाखल होणाऱ्या इयत्ता पहिली व पाचवी तील विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी पद्धतीने करण्यात आले
 जिल्हा परिषदेच्या शाळेवर सर्वसामान्यांचा वाढला विश्वास, अनेक विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
ZP Schoolsakal
Updated on

Mohal : गेल्या दीड महिन्या पासून जिल्हा परिषद शाळेस उन्हाळी सुट्टी होती,मुले मामाच्या गावी गेली होती. आता जून महिना सुरू झाला आहे.

जिल्ह्यात छान पाऊसही झालेला आहे. 15 जून हा शाळेचा पहिला दिवस असल्याने आज मोहोळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी दाखल होणाऱ्या इयत्ता पहिली व पाचवी तील विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी पद्धतीने करण्यात आले.

 जिल्हा परिषदेच्या शाळेवर सर्वसामान्यांचा वाढला विश्वास, अनेक विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
Solapur News : सात दिवसांत उजनीत साडेपाच टीएमसी पाणी; दौंडवरून धरणात ३४०० क्युसेकचा विसर्ग; धरण उणे ५० टक्के

जिल्हा परिषद शाळा चिखली येथे विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये बसवून गावातुन फेरी काढण्यात आली. पोखरापूर शाळेत विद्यार्थ्यांना घोड्याच्या बग्गीमध्ये बसवून गाव फेरी काढण्यात आली.पांडवनगर पोफळी येथे बैलगाडीतुन स्वागत करण्यात आले.शिरापुर येथे विध्यार्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून स्वागत केले.

या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लावलेली झाडे दत्तक घेतली. आष्टे येथे विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. सारोळे येथेही ट्रॅक्टर मधून मिरवणुक काढुन स्वागत केले.ठिक ठिकाणी आनंददायी पद्धतीने हालगीच्या तालात विद्यार्थ्याना गुलाब पुष्प देऊन शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी शाळा फुलांनी व नारळांच्या फाटयांनी सजविण्यात आल्या होत्या. स्वच्छता करण्यात आली होती.

 जिल्हा परिषदेच्या शाळेवर सर्वसामान्यांचा वाढला विश्वास, अनेक विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
Solapur : वरवडे केंद्रातील १७ जि.प. शाळांना सौरऊर्जेवरील वीज; सर्व शाळांमध्ये सौरऊर्जा असणारे राज्यातील पहिले केंद्र

आज सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात आली. दप्तराचे ओझे हलके होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी पासून एकात्मिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती केलेली आहे. त्यानुसार भाग एक चे पुस्तक आज विद्यार्थ्यांना देण्यात आले.

त्या पुस्तकांमध्ये सर्व विषयातील पाठांचा समावेश असलेले एकच पुस्तक विद्यार्थ्यांच्या दप्तरांमध्ये असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

तसेच या वर्षीपासून शनिवारची अर्ध्या दिवसाची शाळा 9 वाजता भरणार आहे. शासन निर्णया नुसार अर्ध्या दिवसाची शाळेची वेळ ही नऊ ते साडे बारा अशी करण्यात आलेली आहे हा बदल चालु वर्षी पासून केलेला आहे.

 जिल्हा परिषदेच्या शाळेवर सर्वसामान्यांचा वाढला विश्वास, अनेक विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
Solpaur : बार्शीतील रस्त्यांबाबत उच्च न्यायालयात याचिका !

मोफत गणवेश राज्यात एकच होणार असून त्याचे वाटप मात्र आज पहिल्या दिवशी करता आले नाही.

आज शालेय पोषण आहारा मधे तालुक्यातील विविध शाळेत गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले या मध्ये लाडू ,शिरा ,जिलेबी अशा प्रकारे वाटप करण्यात आले.

बहुतांश पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत मध्ये प्रवेश घेऊन जिल्हा परिषद शाळेवर विश्वास दाखवलेला दिसून येत आहे.गटविकास अधिकारी अविचल महाडिक,विस्तार अधिकारी बंडु शिंदे यांनी पापरी,पोखरापुर कोन्हेरी,खंडाळी आदी सह अन्य विविध शाळांना भेटी देऊन आढावा घेतला.आजच्या प्रवेश कार्यक्रमासाठी गावातील शिक्षण प्रेमी नागरिक तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केलेले आहे.

 जिल्हा परिषदेच्या शाळेवर सर्वसामान्यांचा वाढला विश्वास, अनेक विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
Solapur News : शनिवारी सोलापुरात अंनिसची राज्य बैठक

दरम्यान आज शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सावळेश्वर येथील शाळेला भेट देऊन आढावा घेतला. धान्य कोठडी स्वच्छ ठेवा, स्वयंपाक गृह स्वच्छ ठेवा, विद्यार्थ्यांची जेवणाची चांगली व्यवस्था करा, जेणे करून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा सूचना दिल्या. यावेळी विस्तार अधिकारी मल्लिनाथ स्वामी, सरपंच पार्वती गावडे, कालिदास गावडे, केंद्रप्रमुख श्री पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका ढमढेरे उपस्थित होते.

चालू वर्षी बहुतांश पालकांनी मोफत व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश घेऊन ग्रामीण भागातील ही शिक्षणाचा दर्जा सुधारल्याचे दाखवून दिले.

रवी चव्हाण-----

सहशिक्षक चिखली ता मोहोळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.