Global Teacher वादाच्या भोवऱ्यात; सोलापूर ZP मध्ये डिसले गुरुजींचा निषेध

रणजितसिंह डिसले गुरुजी वादाच्या भोवऱ्यात
disale guruji
disale gurujisakal
Updated on

सोलापूर: ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांनी पुरस्काराबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Solapur ZP) सभेत काल (ता.४) निषेध नोंदविण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा डिसले गुरुजी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. परितेवाडी आदिवासी भागाची खोटी माहिती सादर केल्याचा आरोप डिसले गुरुजी यांच्यावर झाला आहे. अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ऑनलाइन ही सभा झाली त्यामध्ये निषेध नोंदवण्यात आला.

गेले काही दिवस डिसले गुरुजी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. डिसले गुरुजी यांना अमेरिकेत जाण्यासाठी रजा देण्यावरून यापूर्वी ही बराच वादंग माजला आहे. फुल्ल ब्राईट स्काॅलरशीपसाठी त्यांनी रजा मागितल्यानंतर प्रशासन आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. आता ही ते परितेवाडी प्रकरणात अडकले आहेत. आदिवासी भागाची खोटी माहिती सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.

याबाबत सोलापूर जिल्हा परिषदेची सभा झाली. या सभेत जिल्हा परिषद शाळा, प्रशासन व गावची बदनामी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभेत डिसले यांचा निषेध नोंदवण्यात आला. अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ऑनलाइन ही सभा झाली. सभेत मानसिक त्रास दिला पैशाची मागणी केली असे वक्तव्य करून बदनामी केल्याबद्दल वसंतनाना देशमुख यांनी निषेध नोंदवला. प्रशासनाची बाजू ऐकून न घेता शिक्षणमंत्र्यांनी डिसले यांना रजा देण्यासाठी दबाव आणल्याचे नकाते यांनी सांगितले.

नेमकी काय आहे प्रकरण

परितेवाडी या आदिवासी भागात लोक कन्नड भाषिक असून येथील शाळा जिल्हा परिषदेच्या गोठ्यात भरते. तसेच येथे ८० टक्के बालविवाह होतात अशी माहिती डिसले गुरुजी यांनी पुरस्कारा दरम्यान दिली असा आरोप परितेवाडी जिल्हा परीषद मतदार संघाचे सदस्य भारत शिंदे यांनी केला आहे.

परितेवाडीतील लोक सधन आहेत. येथील नागरीक बहुतांश बांधकाम कामगार कुटुंबे व शेतकरी आहेत.डिसले गुरुजी यांनी फक्त पुरस्कारासाठी शाळेचा वापर करून घेतला. मात्र शाळेच्या विकासासाठी त्यांचा काही उपयोग झाला नाही असाही आरोप शिंदे यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()