'वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू!' 'स्वाभिमानी'चा बागलांना इशारा

'वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू!' 'स्वाभिमानी'चा बागलांना इशारा
'वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू!' 'स्वाभिमानी'चा बागलांना इशारा
'वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू!' 'स्वाभिमानी'चा बागलांना इशाराesakal
Updated on
Summary

दिग्विजय बागल यांच्या विरोधात रविवारी ठिकठिकाणी निषेध व आंदोलने करण्यात आली.

पंढरपूर (सोलापूर) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) भल्याभल्यांची मस्ती आणि धुंदी उतरवली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे. दरम्यान, दिग्विजय बागल (Digvijay Bagal) यांच्या विरोधात रविवारी ठिकठिकाणी निषेध व आंदोलने करण्यात आली. (Ravikant Tupkar has given a warning to Digvijay Bagal)

'वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू!' 'स्वाभिमानी'चा बागलांना इशारा
'आय लव्ह बायको'मुळे फुटले बालविवाहाचे भिंग! मोहोळ येथील घटना

रविवारी (ता. 12) स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे (Vijay Randive) कार्यकर्त्यांसह मकाई कारखान्यावर (Makai Sugar Factpry) थकीत एफआरपीच्या (FRP) मागणीसाठी गेले होते. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल व त्यांच्या समर्थकांनी विजय रणदिवे यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या घटनेनंतर थकीत एफआरपीच्या मुद्द्यावरून सोलापूर जिल्ह्यात आंदोलन पेटण्याची शक्‍यता आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाला आहे. या मारहाणीच्या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राज्यभरातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिग्विजय बागल यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

'वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू!' 'स्वाभिमानी'चा बागलांना इशारा
सिद्धेश्‍वर यात्रेची परवानगी लालफितीत! 'या' दिवशी अंतिम निर्णय

या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकरांनी ही या घटनेचा निषेध करत सोमवारी (ता. 13) आपण स्वतः करमाळ्यात येणार असून तुमचे किती गुंड आहेत ते घेऊन या, आम्ही शेतकऱ्यांची फौज घेऊन येतोय, असे सांगत दिग्विजय बागल यांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात रविकांत तुपकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांना थेट आव्हान देत इशारा दिला आहे. 'लय मस्ती करू नका, माज करू नका, भल्याभल्यांचा माज उतरवणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. येथून पुढे स्वाभिमानीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांकडे वाकड्या नरजेने बघायचा प्रयत्न केला तर डोळे काढून ठेवल्याशिवाय राहणार नाही', असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.