नको नको, बस्सं झालं म्हणत सिद्धेश्‍वर कारखान्यावर पुन्हा धर्म'राज'

नको नको, बस्सं झालं म्हणत सिद्धेश्‍वर कारखान्यावर पुन्हा धर्म'राज'
सिद्धेश्‍वर कारखान्यावर पुन्हा धर्म'राज'
सिद्धेश्‍वर कारखान्यावर पुन्हा धर्म'राज'esakal
Updated on
Summary

मी संघर्ष करून थकलो, बस्सं झालं म्हणून काडादी यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन केले. त्यांची हीच सभा निर्णायक ठरली.

सोलापूर : होटगी रोडवरील श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची (Shri Siddheshwar Sugar Factory) चिमणी वाचविण्यासाठी सातत्याने संघर्षाची भूमिका घेणारे धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) यांनी कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी एक सभा घेतली. त्यावेळी आता मी संघर्ष करून थकलो, बस्सं झालं म्हणून उपस्थितांना भावनिक आवाहन केले. त्यांची हीच सभा निर्णायक ठरली आणि कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात ते यशस्वी झाले. (Re-election of Dharmaraj Kadadi as President of Siddheshwar Sugar Factory)

दक्षिण सोलापूर (South Solapur), उत्तर सोलापूर (North Solapur), अक्‍कलकोट (Akkalkot), मोहोळ (Mohol) व तुळजापूर (Tuljapur) या तालुक्‍यापर्यंत सिद्धेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. कारखान्याबरोबरच श्री सिद्धेश्‍वर देवस्थान पंच कमिटीचे (Shri Siddheshwar Devasthan Panch Committee) अध्यक्ष, अनेक शैक्षणिक संस्थांचे प्रमुख म्हणूनही धर्मराज काडादींची ताकद मोठी आहे. प्रत्येक संस्थेमध्ये काम करताना त्यांना ज्यांनी विरोध केला, त्यावेळी काडादींनी जिभेवर साखर अन्‌ डोक्‍यावर बर्फ ठेवून त्यांच्यावर मात केली. जिल्ह्यातील राजकारणात अनेक बदल झाले, अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. अनेकांना हातून निसटलेली सहकारी संस्था पुन्हा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्या धास्तीने काहींनी कारखाने, संस्थांचे खासगीकरण करून घेतले.

सिद्धेश्‍वर कारखान्यावर पुन्हा धर्म'राज'
'अतिवृष्टी'साठी 1400 कोटी! जानेवारीत मिळणार मदत

मात्र, 1971 साली सुरू झालेल्या श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्यावर काडादी यांचीच सत्ता आहे. 1989 रोजी स्व. आप्पासाहेब काडादी यांनी धर्मराज काडादी यांना पहिल्यांदा स्वीकृत संचालक म्हणून संधी दिली. त्यानंतर 1996 रोजी काडादी प्रथम अध्यक्ष झाले. त्यानंतरही तेच अध्यक्ष झाले. परंतु सहकारी संस्थांच्या अधिनियमात बदल झाला आणि काडादी यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. तरीही, त्यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू मेघराज काडादी यांना अध्यक्ष केले. काही महिन्यातच तो अधिनियम रद्द झाला आणि 2011 पासून धर्मराज काडादी हेच पुन्हा पुन्हा कारखान्याचे अध्यक्ष होत राहिले. त्यांच्या पश्‍चात कारखान्याचे काही खरे नाही, अशी भावना सभासदांमध्ये निर्माण झाली आणि काडादींना त्यांची साथ मिळाली.

आजी-माजी आमदारांची 'मालकां'नाच साथ

विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक काम करताना काडादींनी स्वत:ची मोठी ताकद निर्माण केली आहे. त्यांना विरोध केल्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपल्याला फटका बसू शकतो या भीतीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक लोकप्रतिनिधींनी काडादींना विरोध करण्यापेक्षा जुळवून घेण्याचाच प्रयत्न केला. अक्‍कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (Sidramappa Patil), माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre), विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti), दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), रतिकांत पाटील (Ratikant Patil), शिवसेना नेते प्रकाश वानकर यांच्यासह कॉंग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांनीही काडादींची साथ सोडली नाही. उत्तर सोलापूरचे राष्ट्रवादीचे नेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे (Baliram Sathe) यांचीही मोठी मदत झाली. चाकोते कुटंबीयांसह अनेकांनी त्यांना नेहमीच सहकार्य केले. तर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांनीही उघडपणे विरोध केला नाही. शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनीही कधी विरोध केला नाही. या सर्वांचा मेळ बसवून 'मी तुमचाच' हे त्यांच्या मनात बिंबविण्यात काडादी हे यशस्वी झाले.

सिद्धेश्‍वर कारखान्यावर पुन्हा धर्म'राज'
राष्ट्रवादीतील गटबाजीला तिलांजली द्या! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सूर

दिग्गजांची काडादींना निवडणुकीची ऑफर

राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan), भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)), राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), कॉंग्रेसचे (Congress) माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी धर्मराज काडादी यांना खासदारकीची ऑफर दिली होती, असे बोलले जाते. त्यावेळी ते निवडूनही आले असते, परंतु त्यांनी निवडणुकीपासून लांब राहणेच पसंत केले. ते स्वत: निवडणूक लढवत नाहीत, पण आपल्याला मदत करतील, अशा समजुतीतून अनेक मातब्बर नेतेमंडळी त्यांना विरोध करीत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.