अल्पवयीन मुलाला व मुलीला पळविले ! वाचा शहरातील गुन्हेगारी वृत्त

अल्पवयीन मुलाला व मुलीला पळविले ! वाचा शहरातील गुन्हेगारी वृत्त
अल्पवयीन मुलाला व मुलीला पळविले ! वाचा शहरातील गुन्हेगारी वृत्त
अल्पवयीन मुलाला व मुलीला पळविले ! वाचा शहरातील गुन्हेगारी वृत्तCanva
Updated on
Summary

शहरातील 17 वर्षीय मुलाला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार त्या मुलाच्या वडिलाने वळसंग पोलिसांत दिली.

सोलापूर : शहरातील 17 वर्षीय मुलाला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार त्या मुलाच्या वडिलाने वळसंग पोलिसांत (Valsang Police) दिली. कामासाठी जातो म्हणून घरातून बाहेर पडलेला मुलगा परत आला नाही. त्यानंतर त्याच्या वडिलाने सर्वत्र चौकशी केली. त्याचा शोध लागला नसल्याने त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. पोलिस नाईक माने हे पुढील तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत शहरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी आमिष दाखवून घरातून पळवून नेल्याची घटना 16 ऑगस्ट रोजी घडली. पहाटे एक ते अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पीडित मुलीच्या वडिलांनी सदर बझार पोलिसांना (Sadar Bazar Plice Station, Solapur) दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गंपले या करीत आहेत.

अल्पवयीन मुलाला व मुलीला पळविले ! वाचा शहरातील गुन्हेगारी वृत्त
खासगी शाळांकडून शिक्षणमंत्र्यांच्या फी माफीच्या आदेशाला बगल !

विवाहितेचा पैशांसाठी छळ

घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शीतल विपुल तिवारी यांनी पोलिसांत तशी फिर्याद दिली. त्यावरून पती विपुल कमलनाभ तिवारी, गीता कमलनाभ तिवारी, कमलनाथ विषंभरनाथ तिवारी, अर्चना मुकुल तिवारी, मुकुल कमलनाभ तिवारी व दिलीप सिंग यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी, तुझ्या वडिलाकडून दरमहा 15 हजार रुपये मागवून घेत जा, पैशासाठी तुझ्याशी लग्न केले आहे. तुझ्यापेक्षा चांगली, नोकरदार बायको मिळाली असती, असे म्हणून सासरकडील मंडळींनी मारहाण केली. सासू गीता व जाऊ अर्चना या दोघांनी मिळून शिवीगाळ करत केस धरून मारहाण केली, नांदवून घेण्यास नकार दिला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस नाईक कटके हे पुढील तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलाला व मुलीला पळविले ! वाचा शहरातील गुन्हेगारी वृत्त
भावी संशोधकांचा 'पेट'पूर्वीच तंटा ! परीक्षा न देण्याचा निवडला पर्याय अन्‌...

रमेश निंबाळ खूनप्रकरणातील संशयित आरोपीचा जामीन फेटाळला

उसने दिलेले पैसे परत मागण्याचा तगादा लावल्याने रमेश शरणप्पा निंबाळ (रा. दुधनी, ता. अक्कलकोट) यांचा 19 मार्च 2021 रोजी धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी चन्नप्पा सैदण्पा व्हसूर याचा जामीन अर्ज अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी फेटाळून लावला. संशयित आरोपीविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, संशयित आरोपीची जामिनावर मुक्तता झाल्यास तो पुराव्यात ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. त्याच्याविरुद्ध सकृतदर्शनी पुरावा असल्याने त्याला जामीन देऊ नये, असे प्रतिज्ञापत्र मूळ फिर्यादी (मयताची पत्नी) लक्ष्मी निंबाळ यांच्यातर्फे न्यायालयात दाखल झाले होते. तसेच जामिनास विरोध करणारा लेखी युक्तिवादही त्यांनी न्यायालयात दिला होता. सरकारी वकील ऍड. प्रकाश जन्नू यांचा युक्तिवाद, मूळ फिर्यादीतर्फ दाखल झालेला युक्तिवाद व आरोपीविरुद्धचा पुरावा यावरून न्यायालयाने संशयित आरोपींचा जामीन नामंजूर केला. याप्रकरणी सरकारतर्फे ऍड. जन्नू, मूळ फिर्यादीतर्फे ऍड. जयदीप माने यांनी तर संशयित आरोपीतर्फे ऍड. अब्बास काझी यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.