Madha Loksabha: शरद पवार पक्षातही बंडखोरी? माढा मतदारसंघात अभयसिंह जगताप अपक्ष निवडणूक लढण्याच्या विचारात

Madha Loksabha: धैर्यशील मोहिते-पाटील यांना मिळणार हे समजताच पक्षाचे युवक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Madha Loksabha
Madha LoksabhaEsakal
Updated on

सांगोला : माढा लोकसभा मतदारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी धैर्यशील मोहिते-पाटील यांना मिळणार हे समजताच पक्षाचे युवक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिली जात असल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा तिकीट दिले. या मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले. त्यांनी अखेर तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू अभयसिंह जगताप हे शरदचंद्र पवार गटाकडून माढा लढविण्यासाठी इच्छुक होते. काही महिन्यांपासून त्यांनी या मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात आपला संवाद दौराही सुरू ठेवला होता. परंतु तिकिट मोहिते पाटील यांना मिळत असल्याचे समजताच ते नाराज झाले.

Madha Loksabha
Salman Khan House: अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, 'गॅलेक्सी'बाहेर पहाटे काय काय घडले?

आता त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. याबाबत जगताप म्हणाले की, उमेदवारी देताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. भाजपमध्ये उमेदवारी मागणारे व भाजप पक्षातून आलेल्यांना जर पक्षात उमेदवारी दिली जात असेल तर हे पक्षाच्या विचारसरणीला धरून नाही. आम्ही पक्षाचे काम करीत असताना आता उमेदवारीसाठी धडपडणारे दुसऱ्या पक्षाचे काम करीत होते.

त्यांनाच जर पुन्हा आमच्या पक्षातून उमेदवारी दिली जाणार असेल तर आम्ही शांत का बसावे. कालपर्यंत ज्यांना आपण भ्रष्टाचारी म्हणून आवाज उठवत होतो त्यांनाच आज आपला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करणे हे अन्यायकारक आहे.

Madha Loksabha
Eknath Shinde: किर्तीकरांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची नाराजी? शिवसेनेच्या बैठकीत काय झाली चर्चा?

लगेच गांधीवादी कसे झाले?

अभयसिंह जगताप म्हणाले की, भाजपने तिकीट नाकारल्यामुळेच ते तिकिटासाठी पक्षप्रवेश करणार आहेत. कालपर्यंत संघाचा प्रचार करणारे आज लगेच गांधीवादी कसे झाले? फुले, आंबेडकरांची विचारधारा असणाऱ्या पक्षाने लगेच बटन दाबल्यासारखी विचारधारा कशी बदलू शकते हे समजत नाही.

विचारधारा बदलण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यांच्याकडे कारखाने असल्यामुळे त्यांना उमेदवारी देणार का? आजही त्यांच्या कुटुंबातील सदस्य देवेंद्र फडणवीस यांचे आमच्यावर उपकार आहेत अशी भाषा बोलत असतील तर अशांनाच उमेदवारी का दिली जात आहे असा प्रश्नही जगताप यांनी विचारला आहे.

Madha Loksabha
Rahul Gandhi: भारतात 22 लोकांकडे देशातील 50 टक्के संपत्ती ; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.