Post Office Recruitment : राज्यात ३ हजार १७० डाकसेवकांची भरती; अर्जासाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदत

भारतीय टपाल विभागाकडील विविध पदांच्या एकूण ४४ हजार २२८ जागांसाठी भरती होत असून यात महाराष्ट्रातील तीन हजार १७० जागा आहेत.
recruitment of 3 thousand 170 postal workers in state deadline for application is August 5 jod alert
recruitment of 3 thousand 170 postal workers in state deadline for application is August 5 jod alertsakal
Updated on

सोलापूर : भारतीय टपाल विभागाकडील विविध पदांच्या एकूण ४४ हजार २२८ जागांसाठी भरती होत असून यात महाराष्ट्रातील तीन हजार १७० जागा आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, त्यासाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदत आहे. या भरतीमुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून देशभरातील २३ राज्यांमधील भारतीय टपाल विभागाच्या जागा भरण्यात येणार आहेत. यात ग्रामीण डाकसेवक पदासह अन्य पदांचाही समावेश असून कार्यालयीन पदेही भरली जाणार आहेत.

यासाठीची अधिसूचना टपाल खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. उमेदवार ज्या प्रदेशातून अर्ज करत आहेत तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ग्रामीण डाकसेवक या पदासाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असण्याची अट आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सूट असून पाच ऑगस्ट २०२४ पर्यंतच्या वयाची गणना केली जाणार आहे.

recruitment of 3 thousand 170 postal workers in state deadline for application is August 5 jod alert
Job Alert: तरुणांसाठी खुशखबर! 'या' पोर्टलवर 20 लाखांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध, सरकारने दिली माहिती

पदे व वेतन

ब्रँच पोस्ट मॅनेजर, असिस्टंट पोस्ट मॅनेजर, ग्रामीण डाक सेवक आदी पदांचा भरती प्रक्रियेत समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५ ते २९ हजार वेतन मिळेल. त्यानंतर ग्रेडनुसार या वेतनात वाढ होणार आहे.

अर्जासाठी शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार हा बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेला असावा. त्याला स्थानिक भाषेचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, सायकल चालवता यावी.

recruitment of 3 thousand 170 postal workers in state deadline for application is August 5 jod alert
Solapur Railway Station: सोलापूर रेल्वेस्‍थानकाला फाईव्ह स्टार लूक; अमृत योजनेतून विभागात ४६५ कोटींची कामे

अर्जात दुरुस्तीसाठी तीन दिवस

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी टपाल खात्याच्या https://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्यासाठी पाच ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा.

अर्जाचे शुल्कही ऑनलाईन भरावयाचे आहे. अर्ज प्रक्रियेनंतर त्यात दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठी सहा ते आठ ऑगस्टपर्यंत संधी दिली आहे. निवड प्रक्रिया गुणवत्तेवर परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

recruitment of 3 thousand 170 postal workers in state deadline for application is August 5 jod alert
Solapur Rain Update : पावसाळ्यात सोलापूरच्या प्रत्येक चौकातील कानाकोपऱ्यात मक्याच्या कणसांची विक्री जोरात

सोलापूर विभागात ४९ जागा रिक्त

टपाल खात्याच्या सोलापूर विभागात ब्रँच पोस्ट मॅनेजर व ग्रामीण डाकसेवकाच्या एकूण ४९ जागा रिक्त आहेत. ब्रँच पोस्ट मॅनेजरच्या आचेगाव, अंगलगे, भातांबरे, बोरामणी, बोरगाव, चुंब, घोळसगाव, गुळपोळी, इंचगाव, जामगाव, काजी कणबस, खांडवी, लिंबीचिंचोळी, म्हेसलगे, तडवळे, मुंडेवाडी, निंबर्गी,

रानमसले, सासुरे, श्रीपत पिंपरी, सौंदरे, सुलेरजवळगे, उपळे दुमाला, विरवडे, यावली, असिस्टंट ब्रँच मॅनेजरच्या बोरगाव, डोंबरजवळगे, घारी, गोगांव, गुंजेगाव, जवळगाव, कारंबा, कोळेगाव, तडवळे, नारी, पाटकुल, शावळ, उडगी तर डाकसेवकाच्या गौडगाव, गुरुनानक नगर सोलापूर, करजगी, मैंदर्गी, मंद्रूप, मोहोळ, पानगाव, शिवशाही सोलापूर, एसआरपीएफ कॅम्प सोलापूर, तुळशीदास नगर, वागदरी येथे रिक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.