सोलापूर : सोलापूर महापालिकेत माहिती अधिकाराचा अर्ज स्वीकारण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने संतप्त झालेल्या योगेश पवार यांनी महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीसमोर अर्धनग्न होत ठिय्या आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यास आत्महत्येचा इशाराही दिला.