सोलापूर : जन्म-मृत्यू नोंदीसाठी विलंब झाला तरी आता न्यायालयाची पायरी चढण्याची गरज नाही. २१ दिवसांत अर्ज केल्यास महापालिका किंवा ग्रामपंचायत, नगरपालिकेतून दाखला मिळेल. त्यानंतर एक वर्षापर्यंत जिल्हा निबंधक तथा जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडून आणि एक वर्षानंतर तहसीलदारांकडून दाखला घ्यावा लागेल. जन्म दाखल्यापेक्षा मृत्यू दाखला देताना यंत्रणेकडून कागदपत्रांची काटेकोर पडताळणी केली जाते. जेणेकरून दाखल्याचा पुढे गैरवापर होवू नये, हा त्यामागील हेतू आहे.