Rickshaw Driver : रिक्षाचालकांची रोजची कमाई २०० रुपये, दंड ५० रुपये

रिक्षाचालकांची रोजची कमाई २५० रुपये तर फिटनेस दंड ५० रुपये आहे. हे दंड रिक्षाचालकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही.
Rickshaw
Rickshawsakal
Updated on

सोलापूर - रिक्षाचालकांची रोजची कमाई २५० रुपये तर फिटनेस दंड ५० रुपये आहे. हे दंड रिक्षाचालकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. रिक्षा फिटनेसचा दंड रद्द करा, अन्यथा १६ जुलै रोजी मुख्यमंत्र्याना घेराव घालू, अशा तीव्र शब्दात मोर्चात रिक्षाचालकांनी शासनाला इशारा दिला.

रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चार हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होऊन विविध संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी आपले मत व्यक्त केले. २१ मे २०२४ रोजी संगणकीय प्रणालीवर दंडाची आकारणी सुरू झाली.

रिक्षा फिटनेसकरिता असलेली ६०० रुपयांची ही विलंब शुल्क आज हजारो रुपयात जाऊ लागल्याने रिक्षाचालक चिंतीत झाले आहेत. हे दंड अन्यायकारक असल्याने रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी याविषयी बैठक घेऊन शासनास कळविण्याचे आश्वासन देऊन आपले हात झटकले. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला.

ही मागणी मान्य न झाल्यास १६ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याशिवाय पर्याय नसल्याचे विविध रिक्षाचालक संघटनेच्या प्रमुखांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. या मोर्चाचे आडम मास्तर, रियाजभाई सय्यद, प्रकाश आळंदकर, अजीज खान, सलीम मुल्ला, प्रदीप शिंगे यांनी नेतृत्व केले.

तर सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुनील भोसले, चंद्रकांत गायकवाड, संतोष गायकवाड, अनिल मोरे, राजू सिद्धगणे, रफिक बागवान, जब्बार शेख, बळी गायकवाड, वसंत माने, रफिक पिरजादे, अलीशेर मैंदर्गी, मौलाली दर्जी, शब्बीर फुलमामडी, अकिल शेख, रफिक काझी, सतीश गुंड, असिफ पठाण, नरेश दुगाणे शाम आडम आदींनी विशेष परिश्रम घेतले.

रिक्षाचालक म्हणाले

  • व्यवसायाने छोटे असलेले रिक्षा चालक यामध्ये भरडले जात आहेत.

  • दिवसाची २५० कमाई अन्दंड ५० रुपये, इंधन १०० रुपये मग संसार कसा चालवायचा?

  • उद्योगपतींना करोडो-अरबो रुपयांची कर्ज माफी शासन देत असताना मात्र दिवसाचे १२-१२ तास इमानेइतबारे राबून अहोरात्र प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना फिटनेससाठी दररोज ५० रुपये प्रमाणे दंड आकारून आर्थिक पिळवणूक करत आहेत.

  • रस्त्यावर वाहन चालविताना ट्राफिक पोलिसांचा त्रास सहन करावा लागतो

  • जुलमी दंड रद्द करतील अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.