सोलापूर - गर्भवती महिलांसमोर निरोगी मातृत्वातून निरोगी बाळ जन्माला घालण्यासाठी पहिल्या महिन्यापासून नोंदणी, लसीकरण, पोषण, रक्तक्षयाच्या आजारावर मात करण्याचे आव्हान कायम आहे. विवाहानंतर पहिल्यांदा गर्भवती राहणाऱ्या महिलांना एकाचवेळी सासरच्या नात्यांशी जुळवून घेण्याचा ताणासोबत स्वतःची मातृत्वाची तयारी करावी लागते.
या स्थितीत या महिलेचे पोषणाकडे दुर्लक्ष झाले की रक्तक्षय, कॅल्शिअम व प्रथिनांची कमतरता, फोलीक ॲसिड व लोहाची कमतरता बाळाला जन्मापासून व्यंग, अपुरी वाढ, कमी प्रतिकारक्षमतेचा शाप लागू शकतो. त्यासाठी गर्भवती मातांनी त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.