अक्कलकोटला पुन्हा पावसाने झोडपले! बोरी उमरगे व मोट्याळ रस्ता बंद

अक्कलकोट तालुक्‍याला पुन्हा पावसाने झोडपले! बोरी उमरगे व मोट्याळ रस्ता बंद
अक्कलकोट तालुक्‍याला पुन्हा पावसाने झोडपले! बोरी उमरगे व मोट्याळ रस्ता बंद
अक्कलकोट तालुक्‍याला पुन्हा पावसाने झोडपले! बोरी उमरगे व मोट्याळ रस्ता बंदCanva
Updated on
Summary

अक्कलकोट तालुक्‍यातील अनेक भागात खास करून किणी व चपळगाव मंडळात जोरदार पाऊस झाला आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) तालुक्‍यातील अनेक भागात खास करून किणी व चपळगाव मंडळात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. काल सोमवारी सायंकाळी विजांचा कडकडाट व ढगांच्या प्रचंड गडगडाटासह पावसाला प्रारंभ झाला आणि सुमारे तासापेक्षा जास्त वेळ जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेले दिसले.

काल पुन्हा चपळगाव व किणी मंडळात जास्त पाऊस झाला तर इतर मंडळात कमीअधिक प्रमाणात त्याची नोंद झाली आहे. याचा परिणाम म्हणून कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व स्थानिक परिसरात मोठ्या पावसाने पाण्याची आवक जास्त झाली. त्यामुळे पहाटे साडेपाचपासून कुरनूर धरणातून सहा दरवाजे उघडून सुमारे 2100 क्‍युसेक प्रतिसेकंद एवढा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी अक्कलकोट ते गाणगापूर रस्त्यावरील बोरी उमरगे येथील पुलावर तीन फूट पाणी आले. त्यासाठी दक्षता म्हणून त्या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील जोरदार पावसाने मोट्याळ ते कुरनूर रोडवरील नाला भरून पुलावरून पाणी वाहत होते, त्यामुळे कुरनूर ते मोट्याळ वाहतूक ठप्प झाली होती. पुलाची उंची वाढवावी, पुलाची दुरुती करावी, अशी मागणी येथील नागरिक सतत करीत आहेत. तरीही अद्याप त्याची दखल घेतली जात नाही.

अक्कलकोट तालुक्‍याला पुन्हा पावसाने झोडपले! बोरी उमरगे व मोट्याळ रस्ता बंद
'हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका शिवसेनेची!'

गळोरगी तलाव ओव्हरफ्लो

अक्कलकोट शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेले आणि तीव्र दुष्काळी स्थितीत अनेकवेळा अक्कलकोट वासीयांची तहान ज्या तलावाच्या पाण्याने भागविली गेली, तो गळोरगी तलाव आज तुडुंब भरून सांडव्याने भरून वाहू लागल्याने शेतकरी सुखावला आहे. गळोरगी तलावाची साठवण क्षमता जास्त असल्याने गळोरगी, बासलेगावसह चार ते पाच गावांचा पाणीसाठा वाढण्यास आणि शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी नेहमी गळोरगी तलाव उपयोगी येत असतो. डोंगर कपारीने तसेच नानाविध पक्षी व फुलपाखरूंच्या वास्तव्याने इथले निसर्गसौंदर्य खुललेले असते. आता पावसामुळे पर्यटकांसाठी ही एक चांगली संधी वर्षभर उपलब्ध होऊ शकते.

अक्कलकोट तालुक्‍याला पुन्हा पावसाने झोडपले! बोरी उमरगे व मोट्याळ रस्ता बंद
भोसरेत तीन घरांमध्ये चोरट्यांची जबरी चोरी! मारहाणीत तिघे जखमी

अक्कलकोटला तालुक्‍यात 5 ऑक्‍टोबर रोजी नोंदलेली पावसाची आकडेवारी (कंसाबाहेरील आकडेवारी आजची तर कंसातील आकडेवारी एकूण पावसाची मिलिमीटरमध्ये)

  • अक्कलकोट : 15 (429)

  • चपळगाव : 41 (348)

  • वागदरी : 32 (421)

  • किणी : 13 (74)

  • मैंदर्गी : 06 (230)

  • दुधनी : 13 (301)

  • जेऊर : 05 (244)

  • करजगी : 05 (249)

  • तडवळ : 02 (242)

सरासरी पाऊस एकूण अक्कलकोट तालुका

  • आजचा पाऊस : 14.66 मिमी

  • एकूण पाऊस : 304.22 मिमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.