ऊसतोड कामगारच दरोडेखोर! गाडी भाड्यासह झालेला खर्च काढण्यासाठी शिजविला दुसरा प्लॅन

बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) जवळील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून बाबुराव हिरजे यांचा खून करून त्यांच्या घरातून 75 हजारांचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील आठपैकी सहाजणांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते सर्वजण ऊसतोड कामगार असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी दर्गनहळ्ळी परिसरात ऊसतोड केली आहे. त्यावेळीच पाटील यांच्या घरावर दरोडा टाकण्याचे ठरविल्याची माहिती समोर आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ऊसतोड कामगारच दरोडेखोर! गाडी भाड्यासह झालेला खर्च काढण्यासाठी शिजविला दुसरा प्लॅन
Updated on
ऊसतोड कामगारच दरोडेखोर! गाडी भाड्यासह झालेला खर्च काढण्यासाठी शिजविला दुसरा प्लॅन
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! महिलांना 'भरोसा' अन्‌ 'शक्‍ती'ही मिळेना

सोलापूर : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) जवळील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून बाबुराव हिरजे यांचा खून करून त्यांच्या घरातून 75 हजारांचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील आठपैकी सहाजणांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते सर्वजण ऊसतोड कामगार असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी दर्गनहळ्ळी परिसरात ऊसतोड केली आहे. त्यावेळीच पाटील यांच्या घरावर दरोडा टाकण्याचे ठरविल्याची माहिती समोर आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ऊसतोड कामगारच दरोडेखोर! गाडी भाड्यासह झालेला खर्च काढण्यासाठी शिजविला दुसरा प्लॅन
पोलिस अधीक्षकांची तांड्यावरील महिलांसोबत 'परिवर्तन' होळी

दर्गनहळ्ळी रोडवरील हिरजे यांच्या वस्तीवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद, जि. नगर) हा म्होरक्‍या आहे. अजयदेवगण उर्फ देवगण सपा शिंदे, सुनिल उर्फ गुल्या सपा शिंदे (दोघेही रा. शेळगाव, ता. परांडा), ज्ञानेश्‍वर लिंगु काळे (रा. पांढरेवाडी, ता. परांडा), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम) हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. संतोष झोडगे (रा. डोकेवाडी, ता. भूम) हा त्यांना घेऊन आलेल्या गाडीचा चालक आहे. झोडगे याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर काळे आणि देवगण व गुल्या या दोघांची पोलिस कोठडी उद्या (सोमवारी) संपणार आहे. त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. एकाला नगर, दुसऱ्याला बीड तर दोघांना लोणीकाळभोर आणि एकाला भूम येथून अटक करण्यात आली. दरम्यान, ज्ञानेश्‍वर काळेची पोलिस कोठडी 24 मार्चपर्यंत असून विकास भोसले याला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, अक्षय काळे रा. पिंपळगाव, ता. जामखेड आणि अनुज उर्फ नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम) यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, परजिल्ह्यातून ऊसतोड कामगार सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर त्या त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांकडून त्या सर्वांची नावे आणि मोबाइल क्रमांक घ्यावेत, अशा सूचना यापूर्वीच पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत. ग्राम सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऊसतोड कामगारच दरोडेखोर! गाडी भाड्यासह झालेला खर्च काढण्यासाठी शिजविला दुसरा प्लॅन
सोलापूर : शहरातील गुन्हेगारीत होतेय वाढ

तपास पथकाला मिळणार मोठे बक्षीस
दरोडेखोरांना पकडण्यात यशस्वी झालेल्या पोलिसांच्या पथकाला प्रोत्साहनपर बक्षीस मिळावे म्हणून पोलिस महानिरीक्षक कार्यालयास प्रस्ताव पाठविला जाणार आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे, सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत आवटे, अतुल भोसले, अंकुश माने, नागनाथ खुणे, प्रविण सपांगे, पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सुरज निंबाळकर, सहायक फौजदार खाजा मुजावर, राजेश गायकवाड, श्रीकांत गायकवाड, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, बापू शिंदे, सलिम बागवान, आबा मुंडे, मोहन मनसावाले, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, पोलिस नाईक रवि माने, दया हेंबाडे, अमोल माने, लाला राठोड, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, नितीन चव्हण, पांडुरंग काटे, सचिन गायकवाड, व्यंकटेश मोरे, अन्वर आतार, रतन जाधव, देवा सोनलकर, चालक प्रमोद माने, रामनाथ बोंबिलवार, केशव पवार, समीर शेख यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.