महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत आमदार शहाजी पाटील व इतरांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे.
महूद : भारताची चांद्रयान-३ मोहीम (Chandrayaan-3 Mission) यशस्वी झाल्याने देशाची मान जगभरात उंचावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली देशाची दमदार प्रगती सुरू आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीची आम्हाला अजिबात चिंता नाही, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी चिकमहूद (ता. सांगोला) येथे बोलताना सांगितले.
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांच्या संकल्पनेतून चिकमहूद येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री श्री. आठवले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते (Sangola) बोलत होते.
कार्यक्रमास आमदार ॲड. शहाजी पाटील, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, विधान परिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाऊसाहेब रूपनर, वैभव गीते, सागर पाटील, दादासाहेब लवटे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, स्वप्नील सावंत, पंकज काटे, राहुल काटे, दादासाहेब क्षीरसागर, वैभव काटे आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, 'देशातील सर्व समाजांना एकत्रित करण्याचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्याच विचारावर चालणारे येथील आमदार शहाजी पाटील यांनी सर्व समाजांना एकत्र केले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत आमदार शहाजी पाटील व इतरांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. गावाची प्रगती झाली की देशाची प्रगती होते. यानुसार आमदार शहाजी पाटील तालुक्यातील प्रत्येक गावाच्या प्रगतीसाठी झटत आहेत.'
आमदार शहाजी पाटील म्हणाले, 'आपण सर्वप्रथम आपल्या गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्थापना करून राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रत्येक शब्दाने वंचितांच्या जीवनातील अंधार दूर केला आहे. डॉ. आंबेडकर हे जगभरातील वंचितांचा आधार आहेत.
आपल्या पूर्वजांनी १९३७ मध्ये चिकमहूद या गावात ‘एक गाव एक पाणवठा’ ही योजना राबवून त्यावेळेस जातिभेद संपवला होता. सामाजिक न्यायाच्या चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक तरुण कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचावीत. त्यामुळे ही चळवळ अधिक गतिमान होईल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.