‘आरटीई’चा नियम पायदळी! झेडपी शाळांमध्ये २६००० पदे रिक्त; ‘टेट’ झाली, तरीपण भरती सुरु नाही

बहुतेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ३५ ते ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, अशी स्थिती आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या ६५ हजार शाळांमध्ये २६००० शिक्षक कमी आहेत. अशी भयानक स्थिती असतानाही अजून शिक्षक भरती सुरु झालेली नाही, हे विशेष.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsakal
Updated on

सोलापूर : ‘आरटीई’अंतर्गत प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा, असा नियम आहे. पण, बहुतेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ३५ ते ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, अशी सद्य:स्थिती आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या ६५ हजार शाळांमध्ये २६ हजार शिक्षक कमी आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील झेडपी शाळांमध्ये ७०० पदे रिक्त आहेत. अशी भयानक स्थिती असतानाही अजून शिक्षक भरती सुरु झालेली नाही, हे विशेष.

इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये प्रवेश शुल्क भरमसाठ वाढले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचा मोठा आधार आहे. सोलापूर जिल्ह्यासह आणखी काही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एलकेजी, युकेजीचे वर्ग सुरु केले जाणार आहे. त्यासाठी देखील शिक्षक लागणार आहेत.

पटसंख्या वाढीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे शासनाकडून शिक्षकांची रिक्तपदे भरली जात नाहीत. जिल्हा परिषदेच्या राज्यातील शाळांमध्ये आठ लाख विद्यार्थ्यांसाठी शिक्षकच नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी काही गावांमध्ये गावकऱ्यांनी शिक्षक नाहीत किंवा कमी आहेत म्हणून आंदोलने देखील केली. पटसंख्येअभावी अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे पटसंख्या वाढलेल्या शाळांमध्ये पुरेसे शिक्षकच नाहीत, अशी देखील स्थिती आहे.

‘टेट’ झाल्यानंतर महाराष्ट्र शिक्षण परिषदेने त्या उमेदवारांची गुणवत्ता यादी शिक्षण आयुक्तांना दिली आहे. पण, शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सात महिन्यांपूर्वी केलेली शिक्षक भरतीची कागदावरील घोषणा अजूनही प्रत्यक्षात उतरलेली नाही.

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

  • एकूण शाळा

  • २,७९५

  • शाळांमधील विद्यार्थी

  • २.०६ लाख

  • एकूण शिक्षक

  • ९,१००

  • शिक्षकांची रिक्तपदे

  • ७५९

दोन लाख विद्यार्थ्यांकडे ‘आधार’ नाही

राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांसह खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आदेश एप्रिलमध्ये निघाले. सुरवातीला ३० एप्रिलपर्यंत मुदत होती. तांत्रिक अडचणींमुळे १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यानंतर ३० मेपर्यंत मुदत वाढली. त्यानंतर शाळांना उन्हाळा सुट्ट्या लागल्या आणि पुन्हा १५ जनपर्यंत मुदत मिळाली. १७ जून उजाडला, पण अजून मुदतवाढ मिळाल्याचा कोणताही आदेश शिक्षण विभागाकडून निघालेला नाही. ज्या शाळांनी ८० टक्क्यांहून विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व आधारमधील त्रुटींची दुरुस्ती केली, त्यांची संचमान्यता सुरु झाली आहे. पण, ज्यांचे काम अपूर्ण आहे, तशा शाळांमधील सहा हजार ६६० शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.