महापालिकेचा मिळकतकर आरटीजीएस, एनईएफटी अथवा मोबाईलवरून फोन पे, गूगल पे किंवा ऍमझॉन पे ने भरणाऱ्यांची डोकेदुखी होत आहे.
सोलापूर : महापालिकेचा (Solapur Municipal Corporation) मिळकतकर आरटीजीएस (RTGS), एनईएफटी (NEFT) अथवा मोबाईलवरून फोन पे (Phone Pay), गूगल पे (Google Pay) किंवा ऍमझॉन पे (Amazon Pay) ने भरणाऱ्यांची डोकेदुखी होत आहे. कारण हे पैसे भरल्यासंदर्भातील यूटीआर क्रमांक महापालिकेला दाखविल्याशिवाय कुठल्या मिळकतीचे कर भरला गेला याचा उकल महापालिकेला होत नाही. परिणामी करदात्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून महापालिकेच्या चकरा माराव्या लागत आहेत. (RTGS and NEFT have made it difficult for citizens to pay tax to the Municipal Corporation-ssd73)
गत काही वर्षांपासून महापालिकेने ऑनलाइन तसेच आरटीजीएस, एनईएफटीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे करदात्यांना घरबसल्या कर भरण्याची सोय झाली आहे. अलीकडे करदाते ऑनलाइन तसेच आरटीजीएस, एनईएफटीबरोबरच फोन पे, गूगल पे, ऍमझॉन पे या माध्यमातून देखील कर भरणा करीत आहेत. मात्र, यापैकी ऑनलाइन पद्धतीने कर भरणे सोयीचे ठरत आहे. ऑनलाइन कर कुठल्या मिळकतीचे भरले आहे हे स्पष्ट होते, मात्र आरटीजीएस, एनईएफटीबरोबरच फोन पे, गूगल पे व ऍमझॉन पेबाबत तसे होत नाही. अशा पद्धतीने कर भरल्यास ते कुठल्या मिळकतीचे भरले याची स्पष्टता होत नाही. परिणामी महापालिकेच्या संगणकावर कर भरल्याची नोंदच होत नसल्याने अशा करदात्यांना यावर्षी कर थकीत असल्याची म्हणजे मागील व चालू अशा दोन वर्षांची बिले जात आहेत.
अशी बिले आल्यामुळे करदात्यांना धक्का बसून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. असे लोक महापालिकेत येऊन तक्रारींचा पाढा वाचत कर विभागातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत. यावर अधिकारी गतवर्षी भरलेल्या करासंदर्भातील यूटीआर (युनिट ट्रॅन्झॅक्शन रीसिट) नंबर करदात्यांकडून घेऊन त्याआधारे कुठल्या मिळकतीचे कर भरले याची नोंद करून बिल दुरुस्ती करीत आहेत. या प्रकारामुळे करदाते वैतागले असून त्यांना आरटीजीएस, एनईएफटीने कर भरणे कटकटीचे वाटत आहे. अशा तक्रारींचे निरसन करण्यासाठी कर विभागात कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
समस्या न उद्भवण्यासाठी घ्यावी खबरदारी
आरटीजीएस, एनईएफटीने कर भरणा केल्यावर समस्या उद्भवू नये, म्हणून करदात्यांनी पुढील खबरदारी घेणे गरजेचे आहे. कर भरल्यावर 72 तास उलटल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या कर विभागात कर भरणा केलेल्या तपशिलासह संपर्क साधावा. भरणा केल्यासंदर्भातील यूटीआर क्रमांक या विभागाला देऊन त्याआधारे बिल दुरुस्त करून घेऊन भरलेल्या बिलाची पावतीही घ्यावी. असे न केल्यास महापालिकेच्या रेकॉर्डवर कर थकीतच असल्याची नोंद राहील आणि यामुळे समस्या उद्भवून महापालिकेच्या चकरा मारायची वेळ येईल. यामुळे मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागेल.
आरटीजीएस, एनईएफटी, फोन पे, गूगल पे किंवा ऍमझॉन पे या माध्यमाने कर भरणा केल्यास 72 तासांनंतर कधीही करदात्यांनी प्रत्यक्ष महापालिकेत कर विभागाशी तपशिलासह संपर्क साधावा. यूटीआर क्रमांकासंदर्भातील अडचण दूर करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
- एन. के. पाटील, उपायुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.