सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटींचा अपहार!

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटींचा अपहार!
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटींचा अपहार!
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटींचा अपहार!Sakal
Updated on
Summary

अकलूज येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेच्या लेखापरीक्षणावेळी ठेवी आणि बॅंकेतील रक्‍कम यात तफावत दिसून आली.

सोलापूर : अकलूज (Akluj) येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेच्या (Sahakar Maharshi Shankarrao Mohite-Patil Bank) लेखापरीक्षणावेळी ठेवी आणि बॅंकेतील रक्‍कम यात तफावत दिसून आली. त्यानंतर चार्टर्ड अकांउटंट (Charterd Accountant) गोकूळ व्यंकटलाल राठी (Gokul Rathi) यांनी थेट अकलूज पोलिस ठाणे (Akluj Police Station) गाठले. बॅंकेच्या अकलूज येथील मुख्य शाखेसह टेंभुर्णी (Tembhurni), करमाळा (Karmala), सोलापूर (Solapur), इंदापूर (Indapur) व कोथरुड (Kothrud) येथील शाखांमध्ये तब्बल 27 कोटी सहा लाख 19 हजारांचा अपहार झाल्याची फिर्याद त्यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार बॅंकेच्या सरव्यवस्थापकासह पाच शाखा व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटींचा अपहार!
डिसेंबर-जानेवारीत महाविद्यालयांची ऑफलाईन परीक्षा !

कोरोना काळात बॅंकेचे व्यवहार ठप्प होते. 2020-21 मधील ऑडिट झाले नसल्याने बॅंकेने चार्टर्ड अकांउटंट गोकूळ राठी यांच्या माध्यमातून लेखापरीक्षण करून घेतले. त्यावेळी 3 एप्रिल 2021 ते 20 ऑक्‍टोबर 2021 या काळातील बॅंकेच्या रकमेत तफावत आढळत असल्याचे लेखापरीक्षणातून समोर आले. अकलूज येथील बॅंकेच्या मुख्य शाखेत 24 कोटींहून अधिक तर करमाळ्यातील शाखेत दीड कोटींपर्यंत, टेंभुर्णी व सोलापूर शाखेत जवळपास एक कोटी सात लाख, इंदापूर, कोथरुड शाखेत 40 लाखांचा अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदारांचे संरक्षण अधिनियमातील कलम तीनसह इतर कलमांअंतर्गत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिली.

आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास

अकलूज येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटींहून अधिक रुपयांचा अपहार झाला आहे. अकलूज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली, परंतु रक्‍कम मोठी असल्याने पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी फिर्यादीने दिलेल्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करतील. दरम्यान, या प्रकरणाची माहिती देण्यासंदर्भात अकलूज पोलिसांनी सावध भूमिका घेतली होती.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटींचा अपहार!
'PSI'ची वाढणार वयोमर्यादा? बुधवारी होणार कॅबिनेटमध्ये निर्णय

अपहारासंदर्भातील ठळक बाबी...

  • अकलूज शाखेत 24 कोटी 18 लाखांची तफावत; बॅंकेचे सरव्यवस्थापक नितीन बाळकृष्ण उघडेंविरुद्ध गुन्हा

  • टेंभुर्णी शाखेत 53 लाख 84 हजारांची तफावत; शाखा व्यवस्थापक रवींद्र पताळेंविरुद्ध गुन्हा

  • बॅंकेच्या करमाळा शाखेत एक कोटी 40 लाखांची तफावत; शाखा व्यवस्थापक समीर दोशींविरुद्ध गुन्हा

  • सोलापूर शाखेत 53 लाख 34 हजारांची तफावत; शाखा व्यवस्थापक प्रदीप उघडेंविरुद्ध गुन्हा दाखल

  • इंदापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक सचिन सावंतविरुद्ध गुन्हा; साडेसहा लाखांचा अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद

  • बॅंकेच्या कोथरुड शाखेत 33 लाख 45 हजारांचा अपहार; शाखा व्यवस्थापक राहुल पिंजारदिवेंविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.