पंढरपुरच्या पोराची बातच निराळी; सलग दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा केला भीम पराक्रम !

सलग दुसर्‍या वर्षी इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचा पराक्रम सहिष्णू जाधव याने केला आहे. | Sahisnu Shivanand Jadhav Conquers English Bay for Second Time with Record Swim
पंढरपुरच्या पोराची बातच निराळी; सलग दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा केला भीम पराक्रम !
Updated on

Pandharpur:

पंढरीचा सुपुत्र सहिष्णू शिवानंद जाधव या १६ वर्षीय मुलाने २९ जुलै रोजी दुसर्‍यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचा भीम पराक्रम केला आहे. बर्‍याच जणांसाठी इंग्लिश खाडीचा विजय हा एकदाच साध्य असतो, पण सलग दुसर्‍या वर्षी इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचा पराक्रम सहिष्णू जाधव याने केला आहे.

आजपर्यंत फक्त ६५ भारतीयांनी इंग्लिश खाडी पोहून पार केली आहे. त्यानंतर इंग्लिश खाडी दोन वेळा पोहून पार करणारा सहिष्णु हा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे.

पंढरपुरच्या पोराची बातच निराळी; सलग दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा केला भीम पराक्रम !
Pandharpur Ashadhi Ekadashi Updates : आषाढी एकादशीनिमित्त दहा लाखाहून अधिक वैष्णवांचा मेळा पंढरीत

डॉ.शिवानंद जाधव हे मुळचे पंढरपूरचे असून नोकरी निमित्त गेल्या काही वर्षा पासून ते इंग्लड मध्ये स्थायिक झाले आहेत. सहिष्णू हा त्यांचा मुलगा असून गेल्या वर्षी त्याने सहा व्यक्तींच्या पथकांसोबत १६ तासांच्या संघर्षानंतर इंग्रजी खाडी पार केली होती. यावर्षी त्याने तीन जणांच्या पथकासोबत मागच्या वर्षीपेक्षा कमी वेळेत म्हणजे १५ तास ८ मिनिटांत हे अंतर पार केले.

सहिष्णू हा दोन वेळा इंग्रजी खाडी पार करणारा सर्वात तरुण भारतीय असून आजवरच्या इतिहासात केवळ ६५ भारतीयांनी इंग्लिश खाडी पार केली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीने भारतीयांची मान उंचावली आहे आणि त्याचबरोबर असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा देखील मिळाली आहे. खाडी पोहून पूर्ण केल्यानंतर सहिष्णू याचे कुटुंबियांनी भारतीय पध्दतीने औक्षण करून अभिनंदन केले. याप्रसंगी त्याचे आजोबा भाऊसाहेब महाराज भोसेकर जाधव, आजी कौसल्या जाधव, वडील शिवानंद जाधव व आई तृप्ती जाधव उपस्थित होते.

पंढरपुरच्या पोराची बातच निराळी; सलग दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा केला भीम पराक्रम !
Pandharpur Viral Video: ‘रिल’मुळे दीड वर्षांनी सापडली माऊली! छायाचित्रकाराच्या व्हिडिओमुळे मायलेकाची भेट

इंग्लिश खाडीमध्ये पोहणे हे अतिशय आव्हानात्मक असून यामध्ये शारिरीक तसेच मानसिक ताकद पणाला लागते. अतिशय थंड पाणी, प्रचंड वारा, मोठ्या लाटा यामधून हा प्रवास करावा लागतो. हा मार्ग साधारणपणे इंग्रजी ड आकाराचा असतो. हा प्रवास २१ मैलांचा होता, पण समुद्रातील प्रवाह आणि शेवटच्या टप्प्यातील सात फूट उंचीच्या मोठ्या लाटांमुळे २९.८ मैल (४८ किमी.) अंतराचा झाला होता. तरीदेखील न डगमगता जिद्दीच्या व आत्मविश्वासाच्या बळावर सहिष्णू याने दुसऱ्यांदा हे आव्हान लीलया पार करत एक इतिहास रचला आहे.

पंढरपुरच्या पोराची बातच निराळी; सलग दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा केला भीम पराक्रम !
Prakash Ambedkar यांचे Pandharpur मध्ये खळबळजनक वक्तव्य । Manoj Jarange ।

सलग दोनदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचे यश माझे एकट्याचे नाही तर त्या प्रत्येक व्यक्तीचे आहे ज्यांनी मला पाठिंबा दिला, माझे कुटुंब, माझी टीम आणि आपल्या मातीचे आहे. दृढनिश्चय, योग्य प्रशिक्षण, आणि आपल्या इच्छाशक्तीच्या बळाने, आपण जागतिक मंचावर महानता साध्य करू शकतो याचा मला सार्थ अभिमान आहे.

- सहिष्णू जाधव, इंग्लिश खाडी पार करणारा साहसवीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()