Solapur News : तुम्ही निधी मागायला कमी पडू नका मी द्यायला कमी पडणार नाही; समाधान आवताडे

भोसे येथे माझं गाव माझी जबाबदारी परिवारा मार्फत सर्व रोगनिदान शिबिराचेआयोजन करण्यात आले
samadhan autade statement over development work funding politics solapur
samadhan autade statement over development work funding politics solapursakal
Updated on

भोसे : राज्यात सध्या डबल इंजिनचे सरकार असल्यामुळे असून हे सरकार ग्रामीण भागाचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करित असल्याने अपेक्षेपेक्षा जास्त विकास कामे होणार असून तुम्ही निधी मागायला कमी पडू नका मी द्यायला कमी पडणार नाही अशी ग्वाही समाधान आवताडे यांनी भोसे येथे सर्वरोग निदान शिबीर उदघाटन प्रसंगी केले.

भोसे येथे माझं गाव माझी जबाबदारी परिवारा मार्फत सर्व रोगनिदान शिबिराचेआयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब जानकर हे होते.याप्रसंगी माजी सभापती तानाजी काकडे,नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, सूर्यकांत ढोणे,मच्छिन्द्र खताळ,

उपसरपंच बाळासो काकडे, ग्रा.सदस्य सचिन नागणे ,अशोक भगरे ,वसंत निकम,कालिदास पाटील अंकुश यादव, काकासो मिस्कर दत्तात्रय मळगे,धनाजी गडदे, दादासो दोलतडे आदीसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

भोसे आरोग्य केंद्र हे दक्षिण भागातील महत्वाचे व मध्यवर्ती असून येथे रुग्णाची नेहमीच गर्दी असून देखील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे होणारी रुग्णाची हेळसांड थांबवण्यासाठी तातडीने पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याची व्यवस्था केली जाईल असे सांगून आ. आवताडे यांनी भोसे गाव मोठे असून आतापर्यत भरभरून निधी दिला आहे.

आणखीही दिला जाईल असे सांगत राज्यात व केंद्रात एका विचाराचे सरकार असल्याने या दक्षिण दुष्काळी भागातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू असे सांगत माझं गाव माझी जबाबदारी परिवार भोसे गावामध्ये राबवत असलेले सर्व उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आ. अवताडे यावेळी म्हणाले याप्रसंगी भोसे येथील तलाठी जयश्री कल्लाळे यांनी माझं गाव माझी जबाबदारी या परिवारामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास पुस्तके खरेदीसाठी 11000 रुपये मदत आमदार आवताडे यांचे हस्ते प्रदान केली.

प्रास्ताविक डॉ. सिताराम खडतरे यांनी केले गावातील विविध समस्या तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागेबाबत फारुख इनामदार यांनी लक्ष वेधले. सदर शिबिरात पाचशे रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सयाजी हसबे, अंतोष लोहार ,रामकृष्ण शिंदे ,गणेश निकम, अनमोल मोरे रवी मोरे सलोनि मोरे यांनी परिश्रम घेतले रमेश कोरे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()